भाजपची विजय महाविकास आघाडीला अपयश पोटनिवडणुकीत 12 वार्ड व 13 वार्ड मध्ये महिला विजयी

youtube

भाजपाची विजय,महाविकास आघाडीला अपयश

पोटनिवडणुकीत दोन्ही जागेवर भाजपचा झेंडा
सौ, मोहिनी पंकज केशेवाड, व सौ, दुर्गा साईनाथ मंतेवाड विजयी

ढाणकी

जातवैधता प्रमाणपत्र देऊ न शकल्यामुळे रिक्त झालेल्या दोन जागेवर निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकजाहीर झाली होती, त्या जागेवर आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपने कंबर कसली होती,योग्य उमेदवार देत भाजपने या दोन्ही जागा मिळवण्यासाठी अतिशय उत्तम विजयी , प्रभागातील जनतेने सुद्धा भाजपच्या बाजूने कौल देत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून दिले,अतिशय अटीतटीच्या निवडणूकित भाजपने दोन्ही जागेवर यश मिळवून भाजपची शक्ती वाढवली, प्रभाग 12 व 13 मध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव मतदारसंघात जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकल्यामुळे या प्रभागातील दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या, या दोन्ही जागेवर शिवसेनेचे नगरसेवक रमेश पराते व मंदाकिनी नंदनवार हे निवडून आले होते, परंतु यांना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे यांच्या विरोधात नगराध्यक्ष सुरेशजी जयस्वाल यांनी याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवर सुनावणी होत या दोन्ही नगरसेवकाना आपली पदे गमवावी लागली होती, या प्रभागातील रिक्त जागेवर पोटनिवडणुक जाहीर होताच भाजपने व महाविकास आघाडीने आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते,ढाणकी नगरपंचायत मध्ये सध्याचे पक्षीय बलाबल पाहिले तर बहुमत महाविकास आघाडीकडे तर नगराध्यक्ष भाजपचे होते, म्हणून या दोन जागेवर महाविकास आघाडी व भाजपचा डोळा होता,कदाचित या दोन जागेमुळे भाजप आपले बहुमत सिद्ध करु शकेल, भाजपने यावेळी व होतकरू तरुण महिलांना उमेदवारी देत मैदानात उतरवले होते,शहराध्यक्ष रोहित वर्मा यांच्या नेतृत्वात व नगराध्यक्ष सुरेशजी जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात या निवडणुकीचे नियोजन करण्यात आले होते, या नियोजनात उमेदवाराच्या टीमने सुद्धा अथक प्रयत्न करत विजय मिळवला,या निवडणुकीत प्रभाग 13 भाजपाच्या उमेदवार मोहिनी पंकज केशेवाड यांना 287 मते तर महाविकास आघाडीच्या उमेदवार वंदना दत्ता पराते यांना 228 मते तर अपक्ष तर प्रभाग 12 मध्ये भाजपाच्या उमेदवार दुर्गा साईनाथ मंतेवाड यांना 339 मते तर प्रतिस्पर्धी सेनेच्या उमेदवार 230 मतांवर थांबल्या असून अपक्ष उमेदवारला 10 मतांवर समाधान मानावे लागले या दोन जागेमुळे शहरात भाजपा सर्वात मोठा पार्टीने मिळवलेला विजय हा ढाणकी शहरातील सर्व जनतेचा विजय असून महाविकास आघाडीला जनतेने नाकारले आहे, भाजप विकासाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे, जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर राहील, रोहित वर्मा शहराध्यक्ष ढाणकी शहर भाजप,
हा विजय माझ्या विकास कामाचे जनतेने दिलेले फळ आहे,महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारले आहे, सुरेशजी जयस्वाल ,नगराध्यक्ष नगर पंचायत ठाणेदार भोस तसेच त्यांचे सर्व कर्मचारी यानी पोलिस बंदोबस्त चौख ठेवण्यात आला.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “भाजपची विजय महाविकास आघाडीला अपयश पोटनिवडणुकीत 12 वार्ड व 13 वार्ड मध्ये महिला विजयी

  1. Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!