प्रसिद्ध बिल्डर संजय बियांनी यांच्यावर भर दिवसा गोळीबार ..सि.सि टिव्हि मध्ये केद ….

youtube

नांदेड शहरात पुन्हा एकदा भर दिवसा झाला प्रसिद्ध व्यापाऱ्यांवर गोळीबार; एकच खळबळ ..

 

 

नांदेड

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर शारदा नगर येथील स्वतःच्या घरापुढे गाडीतून बाहेर निघत असतानाच अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने गोळीबार केला आहे.
नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे नांदेड शहरातील आनंद नगर भागात दुकाने बंद करण्यात आली असून तणावाचे वातावरण आहे. बियाणी सकाळी 11 च्या सुमरास आपल्या वाहनाने घरी परतले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर 7 ते 8 गोळ्या झाडल्या. बियाणी यांना 4 गोळ्या लागल्या. त्यांच्या ड्रायव्हर ला हाताला 1 गोळी लागली. गंभीर अवस्थेत बियाणी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच त्यांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या आनंद नगर भागात तणाव निर्माण झाला. या भागातील दुकाने बंद करण्यात आली. एका दुकानावर दगडफेक करण्यात आली. यात दुकानाच्या काचा फुटल्या. आनंद नगर भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. पोलीसांनी याबाबत अद्याप काही प्रतिक्रीया दिली नाही.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “प्रसिद्ध बिल्डर संजय बियांनी यांच्यावर भर दिवसा गोळीबार ..सि.सि टिव्हि मध्ये केद ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!