ओल्या दुष्काळाला कंटाळून कृष्णापुर येथील विजेच्या टॉवरला शेतकऱ्यांनी घेतला गळफास.
ओल्या दुष्काळाला कंटाळून कृष्णापूर येथील विजेच्या टावर गळफास घेऊन आत्महत्या.
उमरखेड..
ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा कृष्णापूर येथे सतत पडणाऱ्या पावसाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांने विद्दूत टॉवर ला आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे 10 च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
सविस्तर वृत्त असे की, कृष्णापूर तांडा येथील अर्जुन रामचंद्र आडे वय अंदाजे 43 वर्ष यांच्या कडे शासनाची वर्ग 2 ची 3 भावामध्ये 10 एकर शेती आहे.
मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, काढणीस आलेले सोयाबीन पाण्याने खरडून गेले, तोंडाशी आलेला दिवाळी सन, मुलांचे शिक्षण, या मूळे अर्जुन आडे हतबल झाला होता. त्यामुळे आज सकाळी त्याने गावाजवळ असलेल्या माळावरच्या विद्दूत टॉवर ला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, 2 मुले, मुलगी, भाऊ असा आप्त परिवार आहे.
अर्जुन सारखी परिस्थिती आज तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची झाली असून शासनाने आता ओला दुष्काळ घोषित करण्याची गरज आहे.
नदीकाठच्या शेतामध्ये गुडघ्या पर्यंत पाणी साचले आहे. यावर शासन कोणताही तोडगा काढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. घटना स्थळी तालुक्याचे विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांनी भेट देऊन मृतक अर्जुन च्या परिवाराचे सात्वन केले आणि शासनाने प्रति हेक्टरी 50000रु मदत जाहीर करण्याची मागणी केली. घटना स्थळी बिटरगाव पोलीस स्टेशनं चे उपनिरीक्षक कपिल मस्के यांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवला असून पुढील तपास सुरु आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.