स्वातंत्र्य सैनिकाच्या दिव्यांग कन्येचा पेन्शनसाठी लढा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला उपोषणाचा इशारा.
स्वातंत्र्य सैनिकांच्या दिव्यांग कन्येचा पेन्शनसाठि लढा.
जळगाव…
तालुक्यातील आसलगाव येथील दिवंगत स्वातंत्र्यसेनानी त्रंबक सोनाजी राऊत यांच्या निधनानंतर वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांच्या वारसाला शासनाने अद्याप पर्यंत पेन्शन सुविधांचा लाभ झालेला नाही. त्यामुळे वारस दिव्यांग कन्या कु.पुष्पा राऊत ही अर्धी पेन्शन लागू व्हावी म्हणून तब्बल पंधरा वर्षापासून लढा देत आहे .शेवटी राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपोषणाचा इशारा दिला त्र्यंबक सोनाजी राऊत यांची २००६ मध्ये निधन झाले. तेव्हापासून तर आज पर्यंत त्यांच्या कन्या कु.पुष्पा राऊत यांनी पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी बुलढाणा, अमरावती ,मुंबई ,दिल्ली ,आदी ठिकाणी कागदपत्रासह वारंवार प्रस्ताव सादर केला सातत्याने त्यांचा पाठपुरावा केला तरीही अद्याप पर्यंत तिला पेन्शन मंजूर झाले नाही. 13 जुलै रोजी तिने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन जिल्हाधिकारी एस. राजमूर्ती यांची त्यांच्या दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आपला प्रस्ताव सादर केला. आपल्या वडिलांची वारस म्हणून आरती पेन्शन लागू करण्यात यावी तसे न झाल्यास येत्या स्वातंत्र्यदिना पासून १५ ऑगस्ट आपण स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असे निवेदन सुद्धा तिने यावेळी दिले. यावेळी कु.पुष्पा राऊत यांच्या समवेत त्यांचे बंधू पुरुषोत्तम राऊत ,महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष मीनलताई आंबेकर, जिल्हा अध्यक्ष काँग्रेसच्या अध्यक्ष अँड ज्योती ढोकणे ,प्राध्यापक संतोष आंबेकर यांची उपस्थिती होती.
प्रतिक्रिया
(कुमारी पुष्पा राऊत)
यांनी दिलेली प्रतिक्रिया सन 2007 पासून आम्ही प्रस्ताव जिल्हा जळगाव (जामोद) च्या तहसील कार्यालया पासून तर दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला. मी दिव्यांग असल्याने पेन्शन मिळण्यासाठी सातत्याने प्रवास करण्याचा फार त्रास होतो. तब्बल 15 वर्षे उलटून सुद्धा एक स्वातंत्र्यसैनिकाच्या वारसाला पेन्शन मिळण्यासाठी वातणा सहन करावा लागणे ही शोकांतिका आहे.जो देशसेवासाठी लढला आज त्यांच्या मुलीला गंभीर यातना सोसावे लागतात. आणखी न काय पाहिजे.आणि मी कानाने बहिरी असून मी वाचून तुम्हाला जी माझी जी काही भयानक समस्या आहे ती मी नारीशक्ती चँनल समोर मांडली आहे.