अमृत योजनेतील आडके कंपनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – मनसेचे निवेदन पोलीस अधीक्षकांना
अमृत योजनेतील आडके कंपनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करा.
यवतमाळ..
मनसेचे पोलीस अधिक्षकांना निवेदन
यवतमाळ शहरात अमृत योजनेच्या नावाखाली ठीकठिकाणी टेस्टिंग करण्यासाठी व पाईप लाईन तपासण्यासाठी गेल्या वर्षभरापासून खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. संबंधित काम करणाऱ्या कंपनीवर व ठेकेदारावर जीवन प्राधिकरणाच्या कोणत्याच अधिकाऱ्याचा वचक दिसत नाही त्यामुळेच आत्तापर्यंत चार ते पाच लोकांना या खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला तसेच दैनंदिन जीवनात रोज छोटे-मोठे अनेक अपघात घडत गेले या विषयाची गंभीर दखल घेत मनसेनं नुकत्याच दिनांक 11 सप्टेंबर रोजी ज्या खड्ड्यांमध्ये त्या यवतमाळकर नागरिकाचा मृत्यू झाला त्याच खड्ड्यामध्ये जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन देऊन संबंधित आंदोलन थांबविले परंतु याप्रसंगी मनसेने जर आडके कंपनी व भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास तसेच आडके कंपनीला काळया यादीत समाविष्ट न केल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने एवढी गंभीर घटना होऊनही पोलिस प्रशासनाच्या वतीने संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई अद्याप पर्यंत करण्यात आलेली नाही. संबंधित आडके कंपनी अधिकारी व ठेकेदारांना वाचविण्यासाठी तर पोलिस प्रशासनाकडून ही दिरंगाई करण्यात येत नाही ना असा सवाल आज मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी पोलीस अधीक्षकांना विचारला . यवतमाळकर जनतेचे जीव जात असताना पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्यास कोणाची वाट पाहत आहे असा सवाल यवतमाळकर जनता विचारत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी एक न्याय आणि मोठ्या कंपन्या आणि अधिकार्यांसाठी वेगळा न्यायअसा अजब कारभार या प्रकरणात दिसत आहे .या प्रकरणात पोलीस प्रशासन व जीवन प्राधिकरण याची भूमिका दोषींना पाठीची घालण्याची तर नाही ना कारण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्यांना सरसकट एका गुन्हेगाराप्रमाणे तात्काळ गुन्हे नोंदविण्यात येते आणि एका यवतमाळकर नागरिकाचा जीव जाऊनही पोलीस प्रशासन कशाची वाट पाहत आहे असा सवाल या प्रसंगी करण्यात आला .या चर्चेदरम्यान जोपर्यंत आडके कंपनी दोषी अधिकारी व्यवहारे ,सूर्यवंशी व ठेकेदार नालमवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही आणि संबंधित कंपनीला का यादीत टाकत नाही तोपर्यंत मनसेचा हा लढा असाच सुरू राहील आणि या तात्काळ गुन्हे दाखल न केल्यास लवकरच मनसेच्या वतीने शहर पोलीस स्टेशन आणि जीवन प्राधिकरण यांच्याविरोधात आक्रामक स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला . या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शहर पोलीस स्टेशनला देण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.मनसेच्या या शिष्टमंडळात प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसे जिल्हाध्यक्ष आणि हमदापुरे मनसेचे शहराध्यक्ष एडवोकेट अमित बदनोरे, विकास पवार, दीपक आडे, सुमित झाडे, राज सोलंकी, अजु चव्हाण, अविनाश राठोड, संदीप भिसे ,किशोर नरांजे ,परिक्षित राणे यासह इतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Very great information can be found on blog.Raise blog range
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.