रेशीम उद्योगातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ – उमरखेड मध्ये  स्वयंचलित रेशीम रेलिंग प्रकल्पासाठी शासन अनुदान मंजुरी प्रक्रियेला वेग. नितीन भुतडा

youtube

रेशीम उद्योगातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ –

उमरखेड मध्ये  स्वयंचलित रेशीम रेलिंग प्रकल्पासाठी शासन अनुदान मंजुरी प्रक्रियेला वेग.
नितीन भुतडा

: “रेशीम विभागाने स्थळ पाहणी पूर्ण केली असून शासन अनुदान मंजुरीनंतर लवकरच प्रकल्प उभारणी सुरू होईल. या प्रकल्पामुळे उमरखेड परिसरात रेशीम उद्योग साखळी पूर्ण होऊन शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.” आमदार किसनराव वानखेडे

उमरखेड (ता.प्र.):
उमरखेड तालुक्यातील “सहकार महर्षी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्था लि., र. नं. 104, उमरखेड” येथे २०० हेड क्षमतेचा संपूर्ण स्वयंचलित रेशीम रेलिंग प्रकल्प उभारणीसाठी शासनस्तरावर गती मिळाली आहे.

दिनांक २७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील राज्य रेशीम संचालनालयात आमदार किसनराव वानखेडे, भाजप जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा, उद्योगपती नितीन महेश्वरी आणि डॉ. विजय माने यांच्या नेतृत्वात राज्याचे रेशीम संचालक विनय मून आणि सहसंचालक महेंद्र ढवळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.

सदर प्रकल्पाच्या उभारणीसाठी संस्थेकडून आवश्यक भागभांडवल व जागा उपलब्ध असून, शासनस्तरावरून अनुदान मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात अनुदान मंजूर होण्याची शक्यता असल्याचे संचालनालयाने आश्वासन दिले.

या प्रकल्पामुळे उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि पुसद तालुक्यातील सुमारे ६०० एकर तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच रेशीम कोष प्रक्रिया सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे वाहतूक खर्चात बचत, रेशीम धागा निर्मिती नंतर साठवणूक शक्य असल्यामुळे बाजारात दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालक मंडळाने उपविधीमध्ये रेशीम प्रक्रिया उद्योगाचे उद्दिष्ट समाविष्ट करून सहकार विभागाची आवश्यक मान्यता घेतली आहे. नवीन संचालक मंडळ व त्यांच्या पारदर्शक कार्यामुळे ही संस्था वस्त्रोद्योग साखळीतील प्रगत संस्था होऊन नफ्यात आली असून A ग्रेड ऑडिट प्राप्त संस्था आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “रेशीम उद्योगातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ – उमरखेड मध्ये  स्वयंचलित रेशीम रेलिंग प्रकल्पासाठी शासन अनुदान मंजुरी प्रक्रियेला वेग. नितीन भुतडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!