पाच वर्षीय मुलीवर लैगिक अत्याचार.
पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
आरोपी फरार; पोक्सो दाखल
उमरखेड /प्रतिनिधी: उमरखेड शहरातील साणकवाडी येथील आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला नामक नराधमाने एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर दिनांक 8 मे रोजी लैंगिक अत्याचार केले असून ही घटना काल दिनांक 24 रोजी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 8 मे रोजी पीडित मुलगी वय वर्षे पाच ही दूध आणण्याकरिता आरोपीच्या कोठ्यामध्ये गेली असतात आरोपी नामे शेख नजीर शेख उस्मान दौला वय वर्षे 50 याने मुलीसोबत गैरवर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही दिवसानंतर एका व्हिडीओ क्लिप मुळे हा प्रकार उघडकीस आला. सदर क्लिप बघून पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनला धाव घेत हकीकत सांगितली. सदर फिर्यादीचा रिपोर्ट वरून ताबडतोब गुन्हा नोंद करून पोलीस आरोपीच्या घरी गेले असता आरोपी हा फरार झाला होता.
आरोपींविरुद्ध 376 अ ब भादंवी सह 4, 8 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा फरार आहे. याकरिता आरोपीला शोधण्यासाठी पथक नेमण्यात आले असून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री भालचंद मुंडे, श्री आनंद वागतकर सपोनि संदीप गाडे पुढील तपास करीत आहे.