पुसद नगर परिषदेचे स्थापत्य अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

youtube

पुसद नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता अँन्टी करप्शनाच्याजाळ्यात.

ठेकेदाराकडून 14 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

पुसद…
नालीच्या बांधकामाकरिता ठेकेदाराचे सहा लाख 67 हजाराचे बिल मंजुरीसाठी 14 हजाराची लाच मागणारा अश्विन चव्हाण नामक इंजिनीयर अखेर एसीबीच्या जाळ्यात रंगेहात अडकल्याने पुसद नगरपालिकेमध्ये एकच खळबळ उडाली.
नगरपालिका पुसद अंतर्गत नालीच्या बांधकामाचा ठेका एका ठेकेदारास मिळाला त्या कामाचे सहा लाख 67 हजाराचे रखडलेले बिल काढण्यासाठी नगर रचना अधिकारी अश्विन चव्हाण यांनी ठेकेदार यास 14 हजार रुपयाची मागणी केली होती सदरची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने सदर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळचे डीवायएसपी राजेश मुळे यांच्याकडे दिली असता याबाबत मे महिन्या च्या पहिल्या आठवड्यातील या तक्रारीनुसार तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची टीम परत जात होती परंतु आज 25 मे 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता सदर ठेकेदाराने सायंकाळी 6 वाजता रक्कम घेण्याचे कबूल केले व त्यानुसार एसीबी पथक पुसद नगरपालिकेत दबा धरून बसली असता नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे केबिन बाहेर 14 हजाराची रक्कम स्वीकारून अश्विन चव्हाण यांनी ती खिशात ठेवली आणि ते मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये गेले त्यावेळी ठेकेदाराने इशारा करताच एसीबी ची संपूर्ण टीम मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये येऊन झाडाझडती घेतली असता अश्विन चव्हाण यांच्याकडून 14 हजार रुपये लाचेची स्वीकारलेले रक्कम मिळून आल्याने त्यांना मुख्याधिकारी यांच्या समोरूनच ताब्यात घेण्यात आले आज नगरपालिकेमध्ये मिटींग असल्याने जवळपास सर्वच नगर सेवक तथा अधिकारी वर्ग हजर असल्याने एकदाच उडालेल्या या खळबळजनक घटनेने सर्व जण अवाक झाले सदर ट्रप यशस्वी करण्यासाठी एसीबीचे डीवायएसपी राजेश मुळे, हेडकॉन्स्टेबल सुरेंद्र जगदाळे, पखाले, ठाकूर तसेच राहुल यांच्यासह अजमिरे यांनी सदर चा ट्रॅप यशस्वी केला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!