पंचवीस पंधरा अंतर्गत निधी पंधरा लाख रूपाय.. गावाशेजारील पुल व नाला बांधकाम चे भुमिपुजन -मा.जी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते.
पंचवीस पंधरा निधी
अंतर्गत पंधरा लाख रुपयांचा निधी गावाशेजारील नळकांडी पुल व नाला बांधकामाचे भुमिपुजन शिवसेना माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शुभहस्ते.
.
हदगाव –
हदगाव तालुक्यातील मौजे पेवा येथे शिवसेना माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते
हदगाव मागिल दहा वर्षांपासून दर पावसाळ्यात पेवावाशियांना या नळकांडी पुलावरुन आपला जिव मुठीत धरुन ये जा करावी लागत असल्याने व गावातील प्राथमिक शाळा गावाबाहेरच्या परिसरात असल्याने शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा याच रस्त्यावरुन ऐ जा करावी लागत असल्याने गत दहा वर्षापासून पेवा येथिल ग्रामस्थ सर्वच राजकीय पुढार्यांकडे या पुलाची मागणी करत होते
अखेर शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पेवेकरांच्या सुचनेची दखल घेवून श्री दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर या पुलासाठी व नाल्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवुन या कामाचे भुमिपुजन केल्याने पेवा वाशियांना होणाऱ्या असुविधेपासुन मुक्त केल्याने ग्रामस्थांच्या वतिने शिवसेना माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सर्व गावकऱ्यांच्या वतिने सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले
या कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र जाधव तळणीकर यांनी केले तर सुत्र संचालन विनायक जाधव पेवेकर यांनी केले
यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष शामराव चव्हाण, भगवान शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तालुकाउपाध्क्ष विनायकराव कदम, सुभाष जाधव मनुलेकर, काशीराव पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य बाळु महाजन, प्रभाकर सुर्यवंशी, आनंदराव जाधव,कपिल जाधव, व राजेंद्र जाधव तळणीकर उपस्थित होते