वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार गजानन जिद्देवार गेले असता वाळूमाफियाकडून मारहाण, दोन्ही मोबाईल फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न

youtube

वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास वाळूमाफियाकडून मारहाण, दोन्ही मोबाईल फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न

हदगाव —
तालुक्यातील आष्टी येथील पत्रकार ,मराठी डिजीटल पञकार संघाचे तालुका ऊपाध्याक्ष,गजानन जिद्देवार हे हिमायतनगर तालुक्यातील वीरसनी येथे अवैध वाळू साठा असल्याने ही माहिती तहसीलदार हिमायतनगर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर वाळूचा लिलाव शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास होणार होता सदर वाळू गौरगरीब घरकुल लाभार्थ्यांना वितरित होणार होती. त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी सदर बाबीचे वृत्त संकलन गजानन जिद्देवार करत असताना वाळू माफिया ने त्यांना मारहाण करून दोन्ही मोबाईल फोडून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याची घटना शुक्रवारी वीरसणी ता.हिमायतनगर शिवारात घडली आहे.

याबाबत गजानन जिद्देवार यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले की मी दिनांक 6/6 2025 रोजी शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर तहसील मध्ये हिमायतनगर तहसील अंतर्गत रेती साठ्याची माहिती घेऊन व माहितीचा अधिकार देऊन विरसनी मार्ग हदगाव कडे जात असताना वीरसनी येथे गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाळू साठा होता तो तहसीलने जप्त करून त्याचा लिलाव आज होणार होता सदर बाबीचे माहिती जाणून घेण्यासाठी वृत्तांकन करण्यासाठी गजानन जिद्देवार गेले असता त्या ठिकाणी सात ते आठ ट्रॅक्टर होते पोलीस पाटील, तलाठी, व इतर जनता मोठ्या प्रमाणात हजर होती. व तहसीलदार जाय मोक्यावर येणार म्हणून प्रतीक्षा करत होते. तेवढ्यात जिद्देवार हे वाळूच्या ढगाचे फोटो काढत असताना तिथे हजर असलेला वाळू माफिया तथा शिवसैना शिंदे गटाचा पदाधीकारी शेख अफरोज ,यांनी जिद्देवार यांना येऊन तूच आमच्या तहसीलदार मॅडम कडे वाळूची तक्रार करणारा आहेस का ? म्हणून बेदम मारहाण केली. तसेच सोनू देवसरकर व इतर अज्ञात आठ ते दहा जणांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. व शेख अफरोज व सोनू देवसरकर यांनी अंगावर बसून गळ्यातील चाळीस हजार रुपयांची सोन्याची चैन, काढून घेतली भांडण्याच्या दरम्यान माझ्या खिशातील पाच हजार रुपये कुठे पडले की ? तसेच मी चित्रीकरण केलेले माझे मोबाईल फोडले असल्याची तक्रार हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिली.

दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस स्टेशनला यातील आरोपीविरुद्ध गु.रं.न 120/2025 कलम 119,(1) 118,(1) 115,(2) 351,(2)189,(2) 199,(2) 191,(2) 191,(3) 190 ,324,(4) 324(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
अरोपी अद्याप ही फरार आहेत.
मराठी पत्रकार डिजिटल हदगाव पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गजानन जीदेवार यांच्यावर भ्याड हल्ला करणारे आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी. व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास यावा. सदर घटनेचा निषेध नोंदवून मराठी डिजिटल पत्रकार संघाचे हादगाव तालुकाध्यक्ष मारुती काकडे ,महेंद्र धोंगडे व तसेच मराठी पत्रकार संघाचे वतीने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे.

Google Ad
Google Ad

9 thoughts on “वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार गजानन जिद्देवार गेले असता वाळूमाफियाकडून मारहाण, दोन्ही मोबाईल फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न

  1. Hi there! I just wanted to ask if you ever have any problems with hackers? My last blog (wordpress) was hacked and I ended up losing several weeks of hard work due to no back up. Do you have any solutions to prevent hackers?

  2. Greetings from Colorado! I’m bored to tears at work so I decided to check out your website on my iphone during lunch break. I love the info you present here and can’t wait to take a look when I get home. I’m surprised at how quick your blog loaded on my cell phone .. I’m not even using WIFI, just 3G .. Anyways, awesome site!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!