गोदावरी अर्बन -बेस्ट को-ऑप सोसायटी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.नादेड
गोदावरी अर्बन ” बेस्ट को -ऑप सोसायटी ” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
नांदेड :
राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार क्षेत्राला बळकट करणाऱ्या गोदावरी अर्बनला चेंबर ऑफ इंडिया सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग संस्थेच्या वतीने सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल ” बेस्ट को -ऑप सोसायटी ” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराने गोदावरी अर्बनच्या नावलौकिकात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे . केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला हा पुरस्कार सोहळा डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर , जनपथ , दिल्ली येथे विशेष समारंभरात करण्यात आले. यावेळी , चेंबर ऑफ इंडियन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग संस्थेचे अध्यक्ष मुकेश मोहन गुप्ता , सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा ,यांची प्रमुख उपस्थिती होती .
चेंबर ऑफ इंडियन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग संस्था अर्थात “CIMSME” भारतातील MSME च्या व्यापार आणि वाणिज्यला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी प्रचलित आहे. भारताच्या एकूण आर्थिक वाढीमध्ये MSME क्षेत्र खूप महत्त्वाची भूमिका बजावते. SME क्षेत्राचे महत्त्व समजून घेऊन, CIMSME ने MSME मध्ये त्यांच्या कल्पना आणि कौशल्याची देवाणघेवाण करून त्यांच्या निर्णायक वाढीसाठी जागरूकता पसरवण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत.विशेषतः MSME क्षेत्रातील, बँकांसह हिताचे प्रतिनिधित्व करते; आर्थिक संस्था; MSME फायद्यासाठी द्विपक्षीय संवादाला चालना देण्यासाठी संबंधित मंत्रालये आणि इतर भागधारक.MSME मध्ये शिक्षित आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी सेमिनार, परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि इतर व्यापार प्रोत्साहनात्मक क्रियाकलाप आयोजित करणे चेंबरचे ध्येय आहे. CIMSME ने विविध व्यापार प्रोत्साहनात्मक उपक्रम आयोजित करून MSME क्षेत्राला सक्षम आणि शिक्षित करण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.याच अनुषंगाने सहकार क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देऊन सहकार आणि देशाच्या उद्योग व्यवसायात मोलाची कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन देऊन दरवर्षी गौरविण्यात येते .
मागील अनेक वर्षांपासून गोदावरी अर्बन ही संस्था महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,तेलगांणा, कर्नाटक व गुजरात या पाच राज्यात काम करीत आहे.संस्थेने आपल्या सर्वच शाखा सुसज्ज व संगणिकृत केल्या असून ग्राहकांना आरटीजीस,एनफटी, मोबाईल बँकिंग,एटीम,क्यूआर कोड अशा सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी आपल्या ग्राहकांना देत आहे.सर्वच शाखांमध्ये अत्यंत उच्चविद्याविभूषित कर्मचारी वृंद ग्राहकांना आपली सेवा देण्यास सदैव तत्पर असतात.गोदावरी अर्बनला केंद्रस्तरावरील ” बेस्ट को -ऑप सोसायटी ” पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक खासदार हेमंत पाटील अध्यक्ष राजश्री पाटील व समस्त संचालक मंडळांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले.तर चेंबर ऑफ इंडियन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग संस्थेचे आभार मानले.