राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट अँकर’ पुरस्काराने कोमल सोनटक्के-पाटील यांचा गौरव

youtube

राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट अँकर’ पुरस्काराने कोमल सोनटक्के-पाटील यांचा गौरव

उमरखेड – प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तथा भास्कर व्यायाम शाळा व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २ ऑगस्ट रोजी रेल्वे इन्स्टिट्यूट कार्यालय येथे उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कोमल सोनटक्के-पाटील यांना त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालन कौशल्याची दखल घेत ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट अँकर पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

कोमल सोनटक्के-पाटील यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये प्रभावी सूत्रसंचालन करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

3 thoughts on “राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट अँकर’ पुरस्काराने कोमल सोनटक्के-पाटील यांचा गौरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!