शिक्षणामुळे व्यवहार ज्ञान व नैतिक मूल्यांची शिकवण मिळते – प्राचार्य डॉ. माधवराव कदम [गावंडे महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न]

शिक्षणामुळे व्यवहार ज्ञान व नैतिक मूल्यांची शिकवण मिळते
– प्राचार्य डॉ. माधवराव कदम
[गावंडे महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न]
उमरखेड,
वेळेचे व्यवस्थापन व अभ्यासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांनी जीवन घडवावे. शिक्षणामुळे व्यवहार ज्ञान व नैतिक मूल्यांची शिकवण मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी केले. येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात नव्याने प्रवेशित बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. च्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्था आणि महाविद्यालयातील सर्व विभाग, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
महाविद्यालयाच्या कार्यालयातील विविध कामे व सुविधा आणि राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, करीअर कट्टा, मुलींची ‘नवी दिशा’ संघटना यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रमांची माहिती संबंधित समन्वयक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी कार्यालयातील कर्मचारी नितीन कदम यांनी प्रेरणादायी कविता सादर केली.
प्रा. डॉ. व्ही. पी. कदम, प्रा. एस. बी. वाघमारे, नॅक समन्वयक प्रा. डॉ. कुंतल बोंपिलवार, अमेरिकेतील डॉ. ब्रिजू थंकाचन, ‘माती, पाणी, आशा’ प्रकल्प समन्वयक डॉ. बेट्सी ब्रिजू थंकाचन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण सरपाते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अभय जोशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संदीप चेडे यांनी मानले.
Akustik su kaçağı tespiti Üsküdar’da su kaçağı tespiti hizmetimizle, su sızıntılarına kesin çözüm sunuyoruz. Kırmadan, en uygun fiyatlarla hizmet veriyoruz. https://tsrbooks.com/uskudarda-guvenilir-su-kacagi-tespiti/