गो. सी. गावंडे महाविद्यालयात कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळाचे आयोजन उमरखेड –
गो. सी. गावंडे महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलाचा सन्मान सोहळा आयोजन
उमरखेड –
गो. सी गावंडे कनिष्ठ महाविदयालयातर्फे आयोजित ‘ जागर स्त्री शक्तीचा * या राष्ट्रीय सेवा योजना +२ अभियानांतर्गत “कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व आपल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचा येथेचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष मा.रामसाहेब देवसकर , संस्थेचे सचिव – डॉ.या. मा.राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्र उत्सवाचे औचित साधून
या कार्यक्रमात , डॉ प्रीती दारमवार , भक्ती लाठकर, अरुण लाठकर, मयुरी कावलकर , जनाबाई नागरगोजे, कीर्ती माखणे , स्नेहा निखिल भट्टड, भावना पहुरकर ,पत्रकार सविता चंद्रे,सरस्वती पाटील, वर्षा वनवे, दुर्गा चावरे या सर्व स्त्री शक्तीने आपल्या व्यवसायामध्ये जे भरीव योगदान दिले त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने
त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम होते. वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनराज तायडे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उप- प्राचार्य प्रा.पी.एम.गुजर सर पर्यवेक्षक प्रा.बी.यु . लभशेटवार सर व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नादरे मॅडम व प्रा. हरण मॅडम यांनी केले. प्रास्ताविक प्रा. एस. एस. इंगळे व आभारप्रदर्शन प्रा. एन.डी. ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.