शहरातील दोन सराहीत गुन्हेगारांवर एम.पी. डी. ए. कायद्यांतर्गत कार्यवाही.

youtube

शहरातील दोन सराहीत गुन्हेगारांवर एम.पी. डी. ए. कायद्यांतर्गत कार्यवाही

उमरखेड –

शहरातील विविध गुन्ह्यात समाविष्ट असणारे सराहीत दोन गुन्हेगांरावर जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी स्थानबध्दतेचे आदेश पारित केले होते ही स्थानबध्दता टाळण्याकरीता फरार राहणाऱ्या दोन कुख्यात आरोपीचा शोध घेवुन त्यांना जिल्हा
कारागृह अकोला येथे केले स्थानबध्द करण्यात आले आहे .
उमरखेड पोलीस स्टेशन हददीतील कुख्यात गुन्हेगार आकाश रविप्रसाद दिक्षीत वय २२ वर्ष व विजय गणेश भिमेवार वय २१ वर्षे, दोन्ही रा. शिवाजी वार्ड, उमरखेड जि. यवतमाळ यांचे विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे सन २०२० पासुन घातक हत्यारानिशी गैरकायद्याची मंडळी जमवुन दंगा करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, घातक हत्याराने दुखापत करणे, धार्मीक भावना भडकवणे. अश्लील शिवीगाळ करणे, शस्त्रासह दहशत माजविणे, अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे नोंद झाले होते . त्यांचे विरुध्द वारंवार प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात कोणताही बदल दिसुन येत नसल्यामुळे व दोन्ही गुन्हेगारांनी शहरात स्वतःची दहशत निर्माण केलेली असल्याने पोलीस निरीक्षक पो.स्टे. उमरखेड यांनी दोन्ही गुन्हेगारांना महाराष्ट्र झोपडपटटीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा स्थानबद करण्याकरीता दोघांचेही प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्फतीने मंजुरी करीता जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांचेकडे सादर केले होते. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी दि १४/०९/२०२३ रोजी मान्यता देवुन आकाश दिक्षीत , व विजय भिमेवार यांचे स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले होते.

दोन्ही आरोपीना त्यांचे विरुध्द स्थानबध्दतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला असले बाबतची खबर लागल्याने ते फरार होते. त्यामुळे त्यांचे विरुध्द जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी पारीत केलेले स्थानबध्दतेचे आदेश त्यांना तामील करून स्थानबध्द करणे जिकरीचे झाले होते. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी कायद्याच्या तरतुदीचे बारकाईने अवलोकन करुन जाणुनबुजुन अटक/ स्थानबध्दता टाळण्याच्या उददेशाने फरार राहणान्या गुन्हेगारांवर स्थानबध्दता आदेशास शासनाची मान्यता प्राप्त करुन घेणे बाबत सुचित केले वरुन कायद्यात असलेल्या तरतुदी प्रमाणे नमुद दोन्ही इसमांचे स्थानबध्दतेचे आदेशास शासनाची मान्यता प्राप्त करवून घेतली त्यानंतर
दोघांचा शोध सुरु ठेवला ते स्थानबध्दता टाळण्याकरीता स्वतःची ओळख लपवुन पुणे येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झालेवरुन त्यांचा शोध घेवून त्यांना दि २० / १० / २०२३ रोजी पुणे येथून ताब्यात घेवुन दि २२/१०/२०२३ रोजी अकोला जिल्हा कारागृह अकोला येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

चौकट ।

जे धोकादायक गुन्हेगार स्थानबध्दतेचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी पारीत केले नंतर स्थानबध्दता टाळण्याकरीता फरार राहु अशा मनस्थीत होते त्यांचे या संकल्पनेस चांगलीच चपराक बसली असुन, यापुढे ही समाजात दहशत पसरविणारे धोकादायक गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही असे येथील पोलीस अधिकाऱ्यानी सांगीतले

चौकट ।

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ.. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक . पियुष जगताप,. प्रदीप पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड यांचे मार्गदर्शनात . आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, पोलीस निरीक्षक. शंकर पांचाळ, पो.स्टे. उमरखेड, सपोनि प्रशांत देशमुख, पोलीस अंमलदार विजय पंतगे, दत्ता पवार, संदीप ठाकुर, कैलास नेवकर, नितीन खवडे, अंकुश दरबस्तवार, जगदीश राठोड सर्व पोलीस स्टेशन उमरखेड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!