प्रधान मंत्री आवास योजना मध्ये उमरखेड तालुका सर्वप्रथम पुस्कार स्विकारताना गटविकास अधिकारी प्रविण कुमार वानखडे.

youtube

प्रधान मंत्री आवास योजना मध्ये उमरखेड तालुका सर्वप्रथम पुस्कार स्विकारताना गटविकास अधिकारी प्रविण कुमार वानखडे

उमरखेड

अमृत महा आवाज अभियान 2022 – 2023 मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती व तालुक्यास माननीय संजयभाऊ राठोड पालकमंत्री यांच्या हस्ते दिनांक 15 ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यामध्ये उमरखेड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण करिता प्रथम पुरस्कार श्री प्रवीण कुमार वानखेडे गटविकास अधिकारी व उमरखेड व घरकुल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच राज्य पुरस्कार योजना करिता टाकळी या ग्रामपंचायतीस प्रथम वानेगाव पंचायतीस द्वितीय पुरस्कार मिळाला तर प्रधानमंत्री आवास योजना करिता ग्रामपंचायत निंगणुर ला तिसरा पुरस्कार मिळाला आहे तसेच जिल्हा परिषद गट दराटी यास प्रथम पुरस्कार मिळाला आहे. एकूण उमरखेड तालुक्यात पाच पुरस्कार मिळाले आहे उमरखेड तालुक्यात अभियान काळात म्हणजेच 20 नोव्हेंबर 2022 ते 30 जून 2023 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत एकूण 2369 घरकुले पूर्ण केले आहे. तसेच राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत 526 घरकुले पूर्ण झाली आहेत. सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!