शहरासह ग्रामीण भागात गुटका विक्रीला उधान.
शहरासह ग्रामीण भागात गुटखा विक्रीला उधाण.
लाखोंची उलाढाल
उमरखेड –
मराठवाड्यातून राजरोसपणे अवैद्य गुटख्याची वाहनाद्वारे आयात करून शहरासह ग्रामीण भागात जीवघेण्या गुटखा व सुंगधीत तंबाखुची खुलेआम विक्री सुरु आहे. या अवैध धंद्यात दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अन्न व औषध प्रशासनासह पोलीस प्रशासन लक्ष्मी दर्शनाच्या माध्यमातुन धृतराष्ट्राची भुमीका घेत थेट गुटखा तस्करांची पाठराखण करीत असल्याचे पहावयास मिळत आहे .
मराठवाड्यातील हिमायतनगर या शहरातून चारचाकी व दुचाकीच्या माध्यमातून उमरखेड शहरात व ढाणकी शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात केली जाते. या दोन ठिकाणांवरून शहरासह ग्रामीण भागात गुटखा पोहोचविला जातो.तालुक्यातील शहरांसह ग्रामीण भागातील सर्वच किराणा दुकान व पानटपरी धारकांच्या दुकानांसमोर गुटखा तस्कर मोटरसायकल उभी करून त्यांना गुटखा व सुंगधीत तंबाखु पोहचविण्यात येते. या सर्व प्रकार पोलीस प्रशासन उघड्या डोळ्याने पहात असते . अर्थपुर्ण संबंध जोपासत कारवाई करण्यास धजावत नाहीत.
गुटख्या मध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट सारख्या घातक घटकांमुळे कर्करोगा सारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.तंबाखुजन्य पदार्थांमुळे नागरिकाचे आरोग्य बिघडू नये यासाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटख्या सह तंबाखुजन्य सुपारी , पान मसाला या पदार्थांची निर्मिती आणि विक्री करण्यास बंदी घातली . शासनाच्या या उद्यात हेतूला हरताळ फासण्याचे काम प्रशासनातील अर्थपुर्ण दुर्लक्ष्यामुळे बंदी ही कागदावरच पहावयास मिळते .
कधीतरी एखादी छुटपुट कारवाई करून प्रशासन आपली पाठ थोपटून घेतो . परंतु कायम स्वरूपी गुटखा बंदी करण्यास ठोस उपाय योजना करून तस्करांच्या मुसक्या आवळण्यास धजावत नाहीत .
[चौकट
१० वर्ष शिक्षेची तरतुद]
[गुटखा व संबधित सुंगधीत तंबाखु तसेच तत्सम पदार्थाचे उत्पादन , वाहतूक , साठा , वितरण आणि विक्री होत असल्यास त्यांचेवर कारवाई करून १० वर्ष शिक्षेची तरतुद आहे]