मुसळधार पावसाने चालगणी परिसर जलमल.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220713-WA0417-1024x545.jpg)
मुसळधार पावसाने चालगणी परिसर जलमल
उमरखेड :
जिल्यात मागील पाच दिवसापासून संततधार पाऊस कोसळत आहे. उमरखेड तालुक्यात चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी या भागामध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार प्रजन्यवृष्टी झाली. त्यामुळे गावातील चौक, रस्ते व शेतशीवार जलमय झाल्याचे चित्र आहे.
तालुक्यात चालगणी परिसरामध्ये जून महिन्यात पेरण्या आटोपल्यात पण बळीराज्याला पावसाची प्रतीक्षा होती. जून महिन्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे पेरण्याही घसरपसर झाल्यात. मात्र मागीलपाच दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी ने चालगणी परिसरातील पेनगंगा नदीच्या काठच्या सर्व गावांचे मोठे नुकसान झाले असल्याने बळीराज्याच्या चिंतेत भर पडली आहे.पाच दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे चालगणी सह संपूर्ण तालूका जलमय झाला आहे. तालुक्यात सात्तत्याने होत असलेल्या पावसामुळे नदी, नाले भरून वाहत आहेत. ऐन पीक वाढीच्या वेळी पुर आल्याने नदी,नाल्याच्या काठावरील सर्व शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अश्या जमिनीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
आधीच अठराविश्व् दारिद्र भोगत असलेल्या बळीराज्याच्या नशिबी पोटाची भाकर असूनही नसल्यागत अवस्था झाल्याने पुढे काय करायचे व काय होणार..? विवंचनेत शेतकरी आहेत. त्यामुळे अश्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
बॉक्स :-
हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली
पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसाने परिसर जलमय झाला आहे. तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून परिसरात पुरस्थिती निर्मान झाली आहे. चालगणी परिसरातील हजारो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली आली आहे. उगवलेले अंकुर पुराच्या पाण्याने नष्ट होणार असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगवत आहे.
अतिवृष्टीने तालुक्यात गंभीर पुरस्थिती निर्माण होऊन गावाकऱ्यांच्या घराचे, पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाने सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली असल्याने बळीराज्याचे नुकसान झाले आहे. अश्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने पुराखाली आलेल्या जमिनीचे त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यावी.
– शंकर कदम, शेतकरी चालगणी
टीप : सोबत एक शेतकऱ्याचा फोटो व दोन पुराच्या पाण्याचे फोटो आहेत.