यादवराज नप्ते यांना तातडीने मदत करा – कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे विभागीय आयुक्त व जिल्हा प्रशासनाला आदेश.

यादवराज नप्ते यांना तातडीने मदत करा – कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे विभागीय आयुक्त व जिल्हा प्रशासनाला आदेश.
उमरखेड –
मौजे कुरुळी येथील नुकसानग्रस्त शेतकरी यादवराव नप्ते यांच्या 6 हेक्टर जमीनीचे जिल्हा परिषद सिंचन विभागाचा पाझर तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलाव फुटल्याने तलावातील मोठ मोठे दगड त्यांच्या शेतात आले आहेत त्याचबरोबर संपूर्ण शेतात नाल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यादवराव हे मागील एका महिन्यापासून तहसीलदार,कृषी अधिकारी,जिल्हा परिषदेचे सिईओ, जिल्हाचे कलेक्टर तसेच स्थानिक आमदार यांना भेटून आपली व्यथा मांडत होते परंतु त्यांना आतापर्यंत कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही.यादवराव यांनी त्यांच्या नुकसानीची माहिती पुसद येथे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब व पुसद मतदार संघाचे आमदार लोकनेते आदरणीय इंद्रनील भाऊ नाईक यांना देण्यात आली मंत्री महोदयांनी पुढील आठ दिवसात नुकसान ग्रस्त शेतकरी यादवराव नप्ते यांना मदत देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
यावेळी तालुका राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष बबलू पाटील जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज भाऊ मुडे, बोरगाव चे उपसरपंच कृष्णा इमडे, प्रकाश राठोड, गणेश वाडेकर व अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.