सत्यशोधक भाऊसाहेब माने समाज भूषण पुरस्कार 2019 चे मानकरी

youtube

सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभुषण पुरस्कार 2021 मानकरी  तालुक्यातील 21 व्यक्ती व संस्था सन्मानित

उमरखेड/ प्रतिनिधी:

दरवर्षी देण्यात येणारा सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आले असुन तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या 21 व्यक्ती व संस्थांची निवड यात करण्यात आली असुन पुरोगामी युवा ब्रिगेड च्या द्वितीय वर्धापन दिनी व महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सदर पुरस्काराच्या आयोजनाचे हे द्वितीय वर्ष असून या वर्षी डॉ. विजयराव माने यांच्या संकल्पनेतून उमरखेड तालुका व परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात योगदान दिलेल्या, आपल्या कार्यातून ठसा उमटवलेल्या 21 स्वर्गवासी महानुभवांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ सन्मानार्थ पुरस्कार दिला जाणार आहे.
पुरोगामी युवा ब्रिगेड आणि सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 नोव्हेंबर 2021 वेळ दुपारी 12 वाजता श्रीराम टॉकीज मंगल कार्यालय , उमरखेड येथे महात्मा जोतिबा फुले स्मुर्ती दिनी पुरोगामी चा द्वितीय वर्धापन दिन व सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार च्या वितरण समारोह चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी पुसद चे आमदार इंद्रनील नाईक, तालुक्याचे आमदार श्री.नामदेवराव ससाणे, कृषी शास्त्रज्ञ डॉ.विजयराव माने, नितीन जी भुतडा, शरद जी मैंद, चितांगराव कदम सर, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, कृष्णा पाटील आष्टीकर, प्रज्ञानंद जी खडसे व शहरातील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर पुरस्कारासाठी 21 व्यक्ती व संस्थेची निवड करण्यात आली असून यामध्ये – मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्था (रक्तदान ), औदुंबर वृक्ष संवर्धन समिती (पर्यावरण व वृक्ष संवर्धन), अहेले सुन्नत खिदमत कमिटी (कोरोना काळातील सेवा ), ऍड.श्री. संतोष जैन (विधी सेवा ), श्री.लक्ष्मीकांत नंदनवार (पत्रकारिता ), श्री.अनिल वानखेडे (अत्यावश्यक सेवा ), श्री.दीपक देशमुख (साहित्य लिखाण-ओळख उमरखेड परिसराची ), श्री.संदीप गाडे (प्रशासन ), सौ.सरोज देशमुख (महिला सक्षमीकरण ), प्रा. डॉ. प्र.भा.काळे (संत साहित्य ), श्री.शफी अजीस शेख (शिक्षण ), डॉ. प्रेम हनवते (आंबेडकरी चळवळीचे आधारवड -गोपाळ बाबा वलं गकर ), श्री. अशोक वानखेडे (कृषी ), कै. प्रभाकर बट्टेवार सर (मरणोत्तर) क्रीडा , जाकीर राज (सामाजिक कार्य ), भीमराव नगारे (सामाजिक वनीकरण ), रवींद्र चव्हाण (कवी ), संतोष सुरोशे (दिव्यांग उद्योजक ), दिगंबर माने (स्तंभ लेखक ) मोक्षधाम सुधार सेवा समिती- ढाणकी (सामाजिक वनीकरण ), मोक्षधाम समिती- ब्राम्हणगाव (सामाजिक वनीकरण ) आदींना या वर्षीचा पुरस्कार जाहीर झालं असुन आदींना मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 28 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 12 वाजता श्रीराम मंगल कार्यालय, ढाणकी रोड उमरखेड येथे पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुरोगामी युवा ब्रिगेड व सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समिती उमरखेड च्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!