उमरखेड शिवाजी वार्ड स्मशानभूमी ते लिंबगव्हाण पांदण रस्ता त्वरित करा.

youtube

उमरखेड शिवाजी वार्ड स्मशानभुमी ते लिंबगव्हाण पांदण रस्ता त्वरित करा

शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन ; आमरण उपोषणा चा दिला इशारा

उमरखेड /प्रतिनिधी :

उमरखेड येथील शिवाजी वार्ड स्मशानभुमी ते लिंबगव्हाण कॅनल पर्यंत पांदन रस्त्याचे काम त्वरित करावे अन्यथा 17 ऑगस्टपासून आमरण उपोषणा वर बसणार असल्याचे स्थानिक शेतकरी शेतमजुरांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.
मागील 2009 पासून या रस्ता संदर्भात शेतकरी आणि शेतमजूर यांनी प्रशासनाकडून रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे यासाठी अनेक वेळा निवेदन दिले परंतु निवेदनाला नेहमी प्रमाणे केराची टोपलीच दाखवण्यात आली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून शेतकरी व शेतमजुरांना या रस्त्यावर जाण्यासाठी भर पावसाळ्यात चिखल तुडवत जाव लागतो. शेतकऱ्यांचे आर्थिक व शारीरिक अशा दोन्ही प्रकारचे नुकसान होत असून सदर काम न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा मालक घरी आणण्यासाठी डोक्यावर ओझे घेऊन कसरत करावी लागत आहे. शासनाचे आदेश पांदण रस्ते विषयी स्पष्ट असून देखील वरील पांदण रस्ता हा 2013 पासून आज पावेतो प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत हे काम त्वरित करणे गरजेचे असून शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. सदर कामाची सुरुवात जर पंधरा दिवसात न झाल्यास नाईलाजास्तव सर्व शेतकरी येत्या 17 ऑगस्ट पासुन आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारतील असे निवेदनात उपविभागीय अधिकारी यांना शेतकऱ्यांनी कळविले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!