फुलसांवगी येथील घटना हेलिकॅप्टर बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू.
हेलीकॅप्टर बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
फुलसावंगी
येथील तरुणाचा हेलीकॅप्टर बनविण्याचा प्रयत्न मागील ३ वर्षापासुन चालु होता. १५ ऑगस्टला हेली कॅप्टर उडविण्याचे त्याचे स्वप्न होते. काल रात्री त्याने ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या निर्माणधिन हेलीकॅप्टरचा मागील पंखा उडुन त्या तरुणाच्या डोक्याला लागला त्या मध्ये तो गंभीर जखमी झाला. त्या तरुणाला उपचारासाठी पुसद येथे नेले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. हि घटना रात्री १ : ३० वाजताचे दरम्यान घडली .
शे. इस्माईल शे. इब्राहिम (२८) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. शे. ई स्माईल यांचे बस स्थानक परिसरात वेल्डीग वर्क शॉप आहे. काम करत असताना त्याच्या डोक्यात हेलीकॅप्टर बनविण्याचा प्रयत्न चालु होता. मागील ३ वर्षा पासून तो हेलीकॅप्टर बनविण्याच्या प्रयत्नात होता. अल्पशिक्षीत असल्याच्या या तरुणाचा अफलातुन प्रयोग होता. येणाऱ्या १५ ऑगस्टला त्याचा हेलीकॅप्टर त्याचा हेली कॅप्टर उडविण्याचा प्रयत्न होता. त्या हेली कॅप्टरचे काम अंतिम टप्पात होते. त्या अनु संघाने काल त्याने प्रथम हेलीकॅप्टर उडवून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र येथेच नशिबाने घात केला. हेली कैप्टर उडविणाच्या पहिल्याच प्रयत्नात हेली कॅप्टरचा मागील पंखा तुटून त्या युवकाच्या डोक्याला लागला. त्यामध्ये तो गंभीर जख्मी झाला. त्याला उपचारासाठी पुसद येथे नेण्यात आले परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या अकस्मिक जाण्याने गावा मध्ये हळ हळ व्यक्त केली जात आहे.