अनैतिक संबंधात अडसर असणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला प्रियकराच्या मदतीने खून.

youtube

अनैतीक संबधात अडसर ठरणा-या पतीचा पत्नीनेच केला प्रियकराच्या मदतीने खुन.

चार तासात पोलिसांनी केला घटनेचा उलगडा.

ढाणकी…. सावळेशर

ढाणकी पासुन जवळच असलेल्या सावळेश्वर येथे पत्नीनेच पतीचा गळा आवळुन खुन केल्याचे उघड झाले आहे. सविस्तर वृत्त असे की सावळेश्वर येथिल भिमराव उत्तम काळबांडे हा नेहमी प्रमाणे संध्याकाळी जेवण करून झोपलेला असताना मृतकाच्या पत्नी आणि प्रियकराना अनैतिक संबधामध्ये अडसर ठरणा-या पती भीमराव काळबांडे यांचा गळा आवळुन खुन केला व त्याने आत्महत्या केल्याचा बनाव केला.
या घटनेचा सावळेश्वर येथील पोलीस पाटील अनिल कांबळे यानी बिटरगांव पोलीस स्टेशन ला माहिती दिली. घटनास्थळी बिटरगांव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के , यांनी भेट दिली व ठाणेदार प्रताप भोस यांनी या बाबत जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ दिलीप भुजबळ यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली त्यावरून सहा. पोलीस अधिक्षक अदित्य मिलखेलकर यांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली व तपासाच्या सुचना दिल्या.
घटना स्थळी परिस्थीती जन्य पुरावे संशयास्पद आढळल्याने आपल्या तपासाचे चक्रे फिरवत संशयित मृतकाची पत्नी व तिचा प्रियकर यांना ताब्यात घेवुन चौकशी सुरू केली. सखोल चौकशी अंती आरोपी मृतकाची पत्नी व तिचा प्रियकर यांनी आपला गुन्हा कबुल केला.
नेहमीच मृतक भिमराव काळबांडे हा अनैतिक संबधामध्ये अडसर ठरत होता. यामुळे मृतकाचे आणि त्याच्या पत्निचा शाब्दिक वाद होत होता. अखेर अनैतिक संबधामध्ये अडसर ठरणारा हा वाद कायमचा दुर करण्याचा आरोपी मृतकाची पत्नी व तिचा प्रियकरयाने दिनांक 18 आॅक्टोबर रोजी झोपीत असलेल्या भिमराव याला कायमचे संपवण्याचा कट रचत त्याचा गळा दाबत कायमचे संपवले व सकाळी आरोपी पत्नी व तिचा प्रियकरयांने गावात भिमराव काळबांडे यांने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा बनाव केला. परंतु त्यांनी केलेला बनाव पोलीसांनी त्यांच्याच अंगावर उलवटत भांदवी 302 अंतर्गत गुन्हा नोंद करत आरोपींना ताब्यात घेतले. मृतकाला सावळेष्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशेष म्हणजे बिटरगांव पोलीसांनी अवघ्या चार तासात गुन्हा उघडीस आनत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सदर तपास ठाणेदार प्रताप भोस व उपनिरीक्षक कपिल मस्के यांच्या मार्गदर्षनात पोहवा रवी आडे, मोहन चाटे, रवी गीते, सतिश चव्हाण, निलेश भालेराव, स्वप्निल रायवाडे, गजानन खरात, देवीदास हाके, विद्या राठोड, सुनिता षिंदे, होमगार्ड चंद्रकांत वाढवे, होमगार्ड सचिन यमजलवाड, यांनी तपास करत गुन्हा उघडीस आनन्यास सहकार्य केले.
सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडत नवरा जिवानिषी गेला तर पत्नि तुरूंगात गेल्याने त्यांच्या लहान मुलाचा व मुलीचा वनवास झाला असुन यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

*फोटो*

Google Ad
Google Ad

1 thought on “अनैतिक संबंधात अडसर असणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला प्रियकराच्या मदतीने खून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!