शाळेच्या वेळेत बस न मिळाल्यास – विदयार्थी नी करणार रास्ता रोको
शाळेच्या वेळेत बस न मिळाल्यास – विदयार्थी नी करणार रास्ता रोको
*प्रतिनिधी – उमरखेड*
उमरखेड तालुक्यातील पोफाळी कारखाना बस स्टॉप वरून उमरखेड येथे शाळेत जाण्यासाठी शाळेच्या वेळेत बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थी मुला मुलींनी यापुढे बसव्यवस्था सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बस स्टॉप पोफाळी कारखाना येथून उमरखेड येथे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध होत नाही. पोफाळी कारखाना बस स्टॉप ते उमरखेड हे अंतर अवघं १५ किलोमीटर असून हे अंतर वीस मिनिटांचे आहे. परंतु वीस पंचवीस मिनिटांच्या बस प्रवासासाठी विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी सकाळी नऊ वाजता पासून बसची वाट पहावी लागते. चुकून एखादी बस आलीच तर ती बस त्या स्टॉप वर थांबत नसल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थ्यी मुली मुलांना तासंतास बस स्टॉपवर ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत आहे. गेली सहा महिन्यापासून बस व्यवस्थापक उमरखेड यांना विद्यार्थ्यांनी वारंवार सूचना किंवा निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर विद्यार्थी मुला मुलींनी यापुढे शाळेच्या वेळेत बस सुविधा सुरळीत न झाल्यास ठिय्या आंदोलन किंवा रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी आज दिनांक १८ डिसेंबर २३ रोजी बस व्यवस्थापक उमरखेड यांना देण्यात आले. सदर निवेदनाची माहिती प्रत आमदार नामदेव ससाने, उपविभागीय अधिकारी उमरखेड, तहसीलदार उमरखेड,उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, गटविकास अधिकारी उमरखेड, गटशिक्षणाधिकारी उमरखेड यांना देण्यात आली. आता तरी विद्यार्थ्यांना बस सुविधा वेळेत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यार्थी मुला मुलीचे हे आंदोलन बेटी बचाव, बेटी पढाव या संकल्पाला एक मोठी चपराक आहे.