मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास ३० तारखेपासून राज्यमहामार्गावरील वाहतूक बंद करू सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद मधे माहिती.
मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास ३० तारखेपासून राज्य महामार्गावरील वाहतूक बंद करू
सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद मधे माहिती
प्रतिनिधी
उमरखेड :
सकल मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्यासाठी सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला होता सरकारने वेळकाढू धोरण अवलबींत आरक्षण दिले नाही त्यामुळे उमरखेड, पुसद महागांव व मराठवाड्यातील हदगांव आणि हिमायतनगर तालुक्यातील सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकारपरीषदेत सकल मराठा समन्वयकांनी व उपोषणकर्त्यानी दिला
दि . २६ आक्टोबर पासुन सर्वपक्षीय नेत्यानां गावबंदी करणार तसेच
.. पाचही तालुक्यातील मराठा समाज २८ तारखेपासून आमरण उपोषण करणार आणि ३० तारखेपासून राज्यमहार्गा वाहतुक बंद करणार असून देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ५ लाख पत्र पाठवुन आपल्या भावना त्यांच्या पर्यन्त पोहचविणार हे आंदोलन करतांनां आरोग्य सेवा वगळून बाकी सर्व वाहतुक बंद करण्याचा इशारा यावेळी ५ ही तालुक्यातील समन्वयकांनी दिला .
उमरखेड तहसिलच्या प्रांगणात सकल मराठा समाजाच्या ५ युवकांनी १३ दिवस बेमुदत आमरण उपोषण केले होते त्यानंतर तालुक्यासह शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते मात्र राज्य शासनाने आरक्षणाचा विषय मार्गी न लावल्याने यापुढे उमरखेड ,पुसद, महागांव, हदगांव ,हिमायनगर येथील तालुक्यातील सकल मराठा समाजाने उग्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाडयातील ५ ही तालुक्यातील सकल मराठा समाज उपस्थीत होता
____________________
सोबत फोटो