43 हजार रुपयांची अवैध दारू जप्त पोफाळी पोलीस स्टेशन ची धडक कार्यवाही
43 हजार रुपयांची अवैध दारू जप्त पोफळी पोलीस स्टेशनची धडक कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोफाळी पोलिसांची कार्यवाही
उमरखेड मुळावा प्रतिनिधी-:२० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पोफाळी पोलीसांनी पो.स्टे. हद्दीतील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या जुन्या वसाहतीच्या क्वाटर मध्ये असलेली 43 हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली,सध्या विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून आगामी निवडणूका निःपक्षपातीपणे व भयमूक्त मोकळ्या वातावरणात व्हाव्यात या उद्देशाने अवैधरित्या बेकायदीशीर दारूसाठा जप्त करून त्यावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते.पोफाळी पोलीस स्टेशनमचे ठाणेदार पंकज दाभाडे पॅट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी येथील वसाहतीत एका जुन्या क्वाटर मध्ये अवैध रीत्या दारूचा साठा ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे,पोलीस कॉन्स्टेबल लखन जाधव,यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता त्या क्वाटरला कुलूप लावून असल्याचे दिसून आले, तेंव्हा पोफाळी पोलिसांनी पंचासमक्ष क्वाटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पाहणी केली असता एका पोत्यामध्ये देशी दारूचे 90 मिलीचे एक हजार नग ज्याची किंमत पस्तीस हजार रुपये मॅकडोल्स कंपनीचे 90 मिलीचे 100 नग ज्याची किंमत 8500 रुपये असा एकूण 43500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, सदर आरोपी विरोधात कलम 65{E}नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे,