मणिपूरच्या ” त्या ” घटनेचे पडसाद उमरखेडात ( रणरागिनींचा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला)
मणिपूरच्या ” त्या ” घटनेचे पडसाद उमरखेडात
( रणरागिनींचा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला)
उमरखेड:- मनिपुर येथे घडलेल्या अमानवी घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ आज दि. 3 रोजी विविध सामाजिक संघटनेतर्फे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले मणिपूर घटने च्या संदर्भात कठोर कारवाई करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना देण्यात आले .
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरुन निघालेला मोर्चा मुख्य मार्गाने मार्गस्थ होत महापुरुषांच्या प्रतिमा व पुतळ्याला अभिवादन करत उपविभागीय कार्यालयावर धडकला त्यानंतर तिथे सभेत रूपांतर झाले या ठिकाणी अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी शासनाचा कार्यक्रप्रनालीवर प्रहार करून घटनेचा निषेध व्यक्त केला .
या मोर्चात उमरखेड येथील जिजाऊ ब्रिगेड ,जमात इस्लामी हिंद महिला विभाग ,गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन, भिल नाईकडा आदिवासी सेवा संघ ,आजी-माजी सैनिक संघटना , बिरसा मुंडा क्रांती दल , रणरागिणी महिला संघर्ष समिती या संघटनेचे सदस्य युवक युवती महिला पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले होते.
उपविभागीय कार्यालय समोर झालेल्या सभेत सरोजताई देशमुख , प्रा. मीनाक्षीताई सावळकर , प्रा . नलिनीताई ठाकरे ,शेषराव इंगळे ,विवेक मुडे , प्रा.जयमाला लाडे ,सलमा राहत अन्सारी ,प्रतीक्षा खंदारे ,अंजली कदम , शकुंतलाताई राठोड ,हरणाबाई पेनेवाड, वर्षाताई देवसरकर ,शबाना बी, शारदाताई वानोळे यांनी सभेला मार्गदर्शन केले सभेचे सूत्रसंचालन प्रा अनिल काळबांडे यांनी केले .या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना निवेदन देण्यात आले.