बरडशेवाळा येथील लोकसहभागातून डिजिटल झालेल्या अंगणवाडी चा उद्घाटन सोहळा संपन्न.

youtube

बरडशेवाळा येथील लोकसहभागातून डिजिटल झालेल्या अंगणवाडीचा उदघाटन सोहळा

आजी माजी आमदार यांच्या सह अधिका-यांने उपक्रमाला हजेरी लावत केले कौतुक.

बरडशेवाळा ता.१० ( बातमीदार ) बरडशेवाळा येथील तिन्ही अंगणवाडी सोशल मीडिया च्या माध्यमातून दानशूर व्यक्तींनी दिलेल्या योगदानाने डिजिटल झाल्या असल्याने शुक्रवार दहा रोजी वार्ड क्रं एक च्या अंगणवाडी चा उदघाटन सोहळा आमदार माधवराव पाटील जवळगावकर व माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर यांच्यासह प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमांचा पांयडा उभा करणारे बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे व तत्कालीन पर्यवेक्षीका प्रज्ञा चव्हाण यांच्या सह या सामाजिक उपक्रमात पुढाकार हाती घेणा-या प्रभाकर दहीभाते, सर्व प्रथम योगदान देणाऱ्या हदगाव येथील फारुख पिंजारी, अंगणवाडी परीसर वृक्षाने हिरवा करणा-या हरीचद्रं चिल्लोरे ,इंडस टावर कपंनीचे गोरे यांच्या सह आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ विशेष योगदान देणारे पुणे येथे मुख्य लेखा अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडत असलेले भुमीपुत्र गंगाधरराव मस्के यांच्या सह लोकसहभाग दिलेल्या व्यक्ति चा सन्मान केला.
आमदार जवळगावकर यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून पुढे आलेल्या व्यक्तीचे कौतुक करत गावातील शाळा अंगणवाडीसह गावातील आवश्यक असलेल्या विकासासाठी मी कमी पडणार नाही असे आश्वासन दिले. तर माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमाचे उदघाटक खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने खासदार हेमंत पाटील यांनी उपस्थित राहु शकलो नाही याची खंत व्यक्त करीत शुभेच्छा देऊन अंगणवाडीला भेट देणार असल्याची भावना व्यक्त केली. तर वैद्यकीय अधिकारी डॉ भिसे, पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार माधवराव पाटील जवळगावकर, तर प्रमुख अतिथी माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर, जिल्हा शिक्षण अधिकारी सवीता बिरगे, गट विकास अधिकारी केशवराव गट्टापोड, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे,बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ भिसे, गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले, मनाठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे हदगाव शाखा व्यवस्थापक एस.एस.चोरे, भारतीय माजी सैनिक रणजीत सिंह परदेशी,उप अभियंता विनायकराव ढवळे , पंचायत समिती सदस्य बंडु पाटील तांलंगकर , माजी जिल्हा परिषद सदस्य डिंगाबंर साखरे, बरडशेवाळा प्रतीनिधी सरपंच ज्ञानेश्वर मस्के, उपसरपंच भाऊराव सुर्यवंशी, पोलिस पाटील दत्तात्रय मस्के, तलाठी बि.यु.ईप्पर, ग्रामसेवक आर.बी.मोरे, मुख्याध्यापक सुर्यवंशी,एम.एस.कदम, पळसा सरपंच शिल्पा रणजीत कांबळे, कवाना येथील सरपंच पोटे , उपसरपंच संदिप पवार माजी सरपंच नंदकुमार असोले, शिबदरा सरपंच दुर्गे, केदारनाथ येथील बालासाहेब मस्के व संतोष मस्के, रमेश राठोड गारगव्हान, यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला पर्यवेक्षीका दिवटे यांच्या सह तालुक्यातील पर्यवेक्षीका अंगणवाडी कार्यकर्ती मदतनिस उपस्थित होते.सुत्रंसचालन शिक्षक चेड्डु यांनी केले तर आभार प्रभाकर दहीभाते यांनी केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!