आदिवासी शेतकऱ्याचे घर जळून खाक निगंणुर येथील घटना
आदिवासी शेतकऱ्यांचे घर जळून खाक निंगणुर येथील घटना
उमरखेड
उमरखेड तालुक्यातील अंतर्गत असलेले निंगनुर येथील अचानक लागलेल्या आगीत एका गरीब आदिवासी शेतकऱ्याचे घर जळून झाले भस्मसात झाले असून,येथील कुटुंबप्रमुख देविदास सटवा वायकुळे, पत्नी संगीताबाई देविदास वायकुळे,मुलगा आकाश वायकुळे, मुलगा शंकर वायकुळे, असा त्यांचा आप्त परिवार असून तो परिवार आज अक्षरशः उघड्यावर आलेला आहे.हे नेहमीच उन्हाळा असो,पावसाळा असो, हिवाळा असो,आपल्या शेतामध्ये राहत होते. शेतामध्येच त्यांचे घर होते.परंतु काल लागलेल्या अचानक लागलेल्या आगीच्या तांडवात त्यांची फार मोठी वित्त हानी झाल्याचे कुटूंबाकडून व ग्रामस्थांकडून बोलले जाते. दैवयोगाने त्यांच्यावरील जीवितहानी ठळली आहे. पण नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे.त्यांची ही वित्त हानीचि पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.सद्यस्थितीमध्ये या कुटुंबावर उपासमारीची वेळ अली आहे.तरी त्याना शासनाने आणि वेगवेगळ्या स्वस्थानि मदत करावी अशी मागणी त्त्यांचा कुटुंबाकडून आणि गावाकर्याकडून केल्या जात आहे.