पशुवैद्यकीय मागण्याबाबत उमरखेड पंचायत समिती समोर बेमुदत संप.
*पशुवैद्यकीय मागण्याबाबत, उमरखेड पंचायत समिती समोर बेमुदत संप*
[ पशुचिकित्सा व्यवसायी संघटना जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने]
उमरखेड(प्रतिनिधी)
दि.2_ऑगस्ट
राज्यात शासन जिल्हा परिषद सेवेत पशुसंवर्धन पर्यवेक्षक/ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन विकास अधिकारी गट ब या, संवर्गाचे जवळपास 4 हजार 500 कर्मचारी असून,2853 पशुवैद्यकीय दवाखान्याची संस्थाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या 10 ते 15 वर्षांपासून प्रलंबित असून या मागण्या सोडवण्या संदर्भात संस्थेकडून वर्षानुवर्षे सातत्याने निवेदन व चर्चेच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे.
परंतु महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्या दबावामुळे व खात्याच्या पदवीधारक संवर्गाचे हित जोपासण्याच्या भूमिकेमुळे पदविका/ प्रमाणपत्र धारक पशुवैद्यकांच्या न्याय मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेच्या , विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने, राज्यात पुढील प्रमाणे, आंदोलन पुकारले
पशुपालकांचे होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच पशुपक्ष्यांना तातडीने उपचार व इतर सेवा त्वरित मिळवण्यासाठी, मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन पशुपालकांची कोंडी टाळावी.
भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 मधील सर्व तरतूदीचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करण्यात यावे, प्रमाणपत्र पदविकाधारकांना स्वतंत्रपणे, पशु वैद्यकीय सेवा पुरवण्याची अनुमती प्रदान करावी.
पशुधन पर्यवेक्षकाची,मोठया प्रमाणात रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावीत, अशा मागण्या संदर्भात आज दि 2 ऑगष्ट पासून पंचायत समिती उमरखेड समोर बेमुदत संप पुकारला असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.