शेतकर्‍यांनो जागे व्हा ! तुरटी फिरवण्याची वेळ आली आहे – डाॅ.विजयराव माने.

youtube

शेतकर्‍यांनो जागे व्हा !
तुरटी फिरवण्याची वेळ आली आहे – डॉ विजय माने

 

उमरखेड-

उदा.पाण्याच्या गाळाचे कण पाणी गढूळ करतात .त्या आर्थि पाण्यात तुरटी फिरवावी लागते ,तुरटी फिरल्याने पाण्यातील गढूळ कण बुडाला जाऊन पाणी स्वच्छ होते,’तसेच आपल्यालाही तुरटी फिरवावी लागणार आहे .परंतु तुरटी फिरल्यानंतर कोणीही प्रलोभना पाई स्वच्छ होत असललेले पाणी ढवळू नये अन्यथा या गढूळ पाण्यामुळे कायमचे सामाजिक आरोग्य धोक्यात येईल’. असा इशारा श्रीहरी सुपर मार्केटच्या हाॅलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डाॅ.विजयराव माने यांनी दिला आहे.

उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्था र.नं. १०४ च्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकर लागणार आहे. आपला जीन प्रेस उमरखेड या सहकारी संस्थेचे संचालक मंडळ परिवर्तन करण्यासाठी ‘बहुजन हिताय ,बहुजन सुखाय’ या तत्वाने प्रेरीत असलेले सभासद शेतकर्‍यांचे प्रतिनिधी स्वच्छ प्रतिमेचे ,संस्थे विषयी निष्ठा व प्रामाणिक पणा असलेल्या युवा चेहर्‍यांना संधी देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा सत्यशोधक शेतकरी संघ पॅनल यांचा मानस ठरला आहे
डाॅ.विजयराव माने यांनी ५७० अपूर्ण सभासदाचे शेअर्सची रक्कम पदर मोड करुन भरुन अपूर्ण शेअर्स पूर्ण केले आहे. त्यांची नावे स.निबंधक यांनी आदेश करुन यादी मध्ये नावे समाविष्ट केली आहेत.ही एक चांगली सुरुवात केली असून जुन्या सभासदाचा मताधिकार कायम राहिला आहे .
आपला जीन प्रेस ही संस्था भरभराटीला आणण्यासाठी तसेच शेतकर्‍याचे आश्रयस्थान असलेली संस्था राजकारणाचा ‘अड्डा’ होऊ नये ,या हेतूने या निवडणुकीत सत्यशोधक शेतकरी संघ या नावाने पॅनल तयार करण्यात आले आहे.डाॅ.माने हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब माने माजी आमदार यांचे नातूृ आहेत. नितीन भाऊ माहेश्वरी हे संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले कै.जेठमल माहेश्वरी माजी आमदार यांचे नातू आहेत.वकील असलेले अनिल माने हे आपला जीन प्रेसचे माजी संचालक आहेत.
या दिग्गजांच्या नेतृत्वात मुळावा,ढाणकी,बिटरगाव ,विडूळ,उमरखेड या सर्व साधारण गटातून ,महिला गटातून ,विजेएनटी व ओबिसी गटातून तसेच सहकारी सोसायटी संस्थेतून १६ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.स्वच्छ प्रतिमा असलेल्या व तसेच निवडणुकीला उभे राहणार्‍या इच्छूक उमेदवारांनी पॅनल प्रमुखाकडे आपला प्रस्ताव दाखल करावा .असे आव्हान डाॅ.माने केले आहे.

जिनिंग प्रेसवर कष्टाळु शेतकर्‍यांची सत्ता हवी
लवकरच उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग निवडणूक कार्यक्रम लागणार आहे.त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये स्वच्छ प्रतिमा,निस्वार्थ भावना आणि संस्थेप्रती निष्ठा असणार्‍या प्रामाणिक इच्छूक उमेदवारांना आव्हान करण्यात येते की,त्यांनी सत्यशोधक शेतकरी संघ पॅनल प्रमुखाशी संपर्क करण्याचे कळवले आहे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!