भरधाव टेम्पो ने दुचाकीस्वारास चिरडले.. दुचाकी स्वार गंभीर जखमी…

youtube

भरधाव टेम्पो ने दुचाकीस्वारास चिरडले..
दुचाकी स्वार गंभीर जखमी…
पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले
उमरखेड/प्रतिनिधी – उमरखेड वरून विडुळ ढाणकी च्या दिशेने दूध वाहक करणाऱ्या भरधाव टेम्पो ने कोपरा (बोरी) येथील लग्न समारंभास जात असलेल्या दुचाकी स्वारास समोरासमोर टक्कर देऊन अक्षरशहा शिरडल्यामुळे दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविले असून दुचाकी वर असलेली महिला देखील जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजता विडूळ नजीक असलेल्या नाल्याजवळ घडली
आज सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान भरधाव वेगाने उमरखेड वरून येत असलेल्या दूध वाहक करणाऱ्या MH 14 GU 3820 या क्रमांकाच्या टेम्पोने कोपरा ( बोरी) येथील दुचाकीस्वार संतोष उत्तमराव वानखेडे (४०) हे लग्न समारंभासाठी उमरखेडच्या दिशेने जात असताना विडुळ नजीक असलेल्या कोत्तेवार यांच्या शेताजवळील नाल्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने वानखेडे यांच्या MH 29BH 2076 क्रमांकाच्या दुचाकीला समोरासमोर टक्कर मारून अक्षरशः चिरडले त्यात वानखेडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायाला मोठी दुखापत झाली आणि दुचाकी वर असलेल्या महिलेला देखील गंभीर मार लागला
जखमींना उमरखेड येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले असता दुचाकीस्वार गंभीर असल्यामुळे त्यांना नांदेड येथे पुढील उपचारास हलविण्याची माहिती मिळाली असून अपघात होताच टेम्पो चालक मात्र जखमीला तिथेच सोडून फरार झाल्याचे समजते
टेम्पो चालक हा दररोज दूध वाहक करताना भरधाव वेगाने आपली गाडी चालवत असे, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना या चालकाची नेहमीच भीती वाटत असे अशा गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आहेत
उमरखेड पोलीस स्टेशनला शासकीय दवाखान्यातून अपघात झाल्याची माहिती मिळाली असून अद्यापी तक्रार मात्र दाखल झाली नसल्याचे समजते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!