धक्कादायक घटना दिवसा ढवळया निंगणुरात हाफ मर्डर. 

youtube

धक्कादायक घटना दिवसा ढवळया निंगणुरात हाफ मर्डर

ढाणकी

आज दिनांक ११/५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन बिटरगाव येथे फिर्यादी फारुख खान शाबाद खान वय ३७ वर्षे राहणार निगनूर यांनी रिपोर्ट दिला की, आज सकाळी नऊ वाजून वीस मिनिटाच्या सुमारास गावातील उपसरपंच यांचे पती वलीउल्ला खान व त्यांची मुले यांनी, गावातील आठवडी बाजारासमोरील रोडवरील फिर्यादी याने अतिक्रमण धरल्याचे कारणावरून व फिर्यादी याने माहिती अधिकार ग्रामपंचायतच्या कामकाजाची माहिती मागितल्याच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचा भाचा मतलब खान यांना वलील्ला खान यांनी, त्यांचा मुलगा सादिक खान याला फिर्यादी व त्याचा भाचा याला तलवारीने जीवेठार मारण्याचे सांगितल्या वरून, साजिद खान याने गाडीच्या डिक्कीतून तलवार आणून फिर्यादी याचे पोटावर व त्याचा भाचा मतलब खान याच्या बरगडीवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याचे भाऊ यांनी त्याला मदत केली. अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन बिटरगाव येथे अपराध क्रमांक 216/23 कलम 307 २९४ १४३ १४४ १४७ १४८ १४९ १०९ आयपीसी सह कलम 4 25 शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे 1. वलीउल्ला खान 2. साजिद खान 3. सद्दाम खान 4. राजिक खान कलीम खान या चार आरोपींना अटक करण्यात आले असून, पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रताप बोस, पीएसआय कपिल मस्के, नापोका मोहन चाटे, पोलीस कॉन्स्टेबल भालेराव, पीसी मुंडे, पीसी जाधव व पोलीस स्टेशन बिटरगाव करीत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!