संत नगरी शेगाव येथे ९ व १० एप्रिल रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा

youtube
  1. संत नगरी शेगाव येथे ९ व १० एप्रिल रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा

 

शेगाव (प्रतिनिधी )

 

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळया चे आयोजन रविवार दि. ९ व सोमवार दि. १० एप्रिल रोजी श्री गणेश प्रस्थ, मंगल कार्यालय, पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम एस ई बी चौक, खामगाव रोड, शेगांव जि. बुलढाणा येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, पीठ सहप्रमुख श्री देवेंद्र दलाल, पीठ व्यवस्थापक श्री सुरेश मोरे यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मोफत रुग्णवाहिका सेवा – महाराष्ट्रात विविध महामार्गावर 37 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, ब्लड इन नीड, रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
या कार्यक्रमासाठी पश्चिम विदर्भ पिठ अंतर्गत जिल्ह्यातील व जिल्हा सेवा समिती यवतमाळ पूर्व मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि. ९ व १० एप्रिल रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन, दर्शन व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोनही दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या महंन्मंगल समयी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तइष्ट मित्रांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय जगद्गुरुश्रींच्या प्रवचन व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे साहेब,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब,सहपिठ प्रमुख देवेंद्र दलाल साहेब, पिठ समिती सदस्य, यवतमाळ पूर्व जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे, जिल्हाध्यक्ष सचिन वानखडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सरीता ताई राऊत यांनी केले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!