जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा मुंबई

youtube

जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा

मुंबई
जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 मुंबईत दिमाखात पार पडला. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव करत सन्मानित करण्यात आले. या भव्य व्यासपीठामुळे सन्मानितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान अविस्मरणीय ठरला.

**मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक:**
सोहळ्याला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते **विजय पाटकर**, आमदार **हरून खान**, एकदा मंच उपाध्यक्ष **प्रशांत काशीद**, प्रभात समिती अध्यक्षा **संगीता संजय सुतार**, भाजपा प्रवक्ते **विनोद शेलार**, अंधेरी विधानसभा संघटक **संजय मानाजी कदम**, काँग्रेस महाराष्ट्र सचिव **भावना जैन**, माजी नगरसेविका **अनिता बागवे**, दिग्दर्शक **दीपक राणे**, शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक **आकाश रणधीर**, **लक्ष्मण डोंगळे**, आणि **माता रमाई महिला मंडळ** यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

**विजय पाटकर** म्हणाले, “संपादक **अमोल भालेराव** यांच्या नेतृत्वाखाली जागृत महाराष्ट्र जनजागृती आणि सामाजिक न्यायासाठी अथक कार्य करत आहे. हे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे.”
**आमदार हरून खान** यांनी जागृतच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
**संगीता संजय सुतार** यांनी सांगितले, “जागृत महाराष्ट्र समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडत आहे.”
**विनोद शेलार** यांनी नमूद केले, “मर्यादित साधनांमध्येही जागृत महाराष्ट्र समाजसेवकांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करते, हे खूप मोठे योगदान आहे.”
**संजय मानाजी कदम** यांनी म्हटले, “जागृत महाराष्ट्र जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यात अग्रेसर आहे.”
*पुरस्कारमूर्तींचा सन्मान
खालील व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले:
1. **अंजली पटेल** – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
2. **रेश्मा राजन** – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)
3. **भोसले** – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
4. **संकेत माने** – जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार
5. **गुंजनताई गोळे** – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
6. **नितेश कराळे मास्तर** – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
7. **योगेश राजेंद्र चव्हाण** – जागृत समाजसेवक पुरस्कार
8. **मारुती नागोराव घोटरे** – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)
9. **अॅड. शिवाजी धनगे व अॅड. वनिता** – जनसेवा ओल्ड एज – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
10. **बापू शांताराम परब** – जागृत आदर्श कृषिमित्र पुरस्कार
11. **राकेश चौधरी** – जागृत आरोग्य मित्र पुरस्कार
12. **विशाल गंगाधरराव दादेवाड** – जागृत समाजसेवक पुरस्कार
13. **लक्ष्मण डेंगळे** – जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार
14. **वैशाली निसार अली सय्यद महाडिक** – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
15. **दीपक संदानशिव** – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
16. **नीला दिगंत चंपाणेरी** – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
17. **भानजी मुलजी वाला** – जागृत जनसेवा पुरस्कार
18. **झाहीद शेख** – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
19. **गायत्री विजयन नायर** – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
20. **पूजा पांडे** – जागृत आदर्श कलाकार पुरस्कार
21. **हरिनाथ यादव** – जागृत आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार
22. **रेहाना शेख** – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (आसरा महिला वेल्फेअर)
23. **बलदेव खुमार** – जागृत साहित्य पुरस्कार
24. **सबा खान** – जागृत समाजसेविका पुरस्कार **जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल**चे संपादक **अमोल शोभा गौतम भालेराव**, संचालक **सुरज भालेराव**, कार्यकारी संपादक उपस्थित मान्यवरांनी त्यांचे आभार मानत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!