शिवसेनेच्या उपशहर प्रमुख ज्योतीताई सुरोशे यांच्या कार्याचा साई मंदिरात यथोचित सत्कार राम नवमीचे औचित्य साधत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकारत – उमरखेड

शिवसेनेच्या उपशहर प्रमुख ज्योतीताई सुरोशे यांच्या कार्याचा साई मंदिरात यथोचित सत्कार राम नवमीचे औचित्य साधत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकारत – उमरखेड

youtube

शिवसेनेच्या उपशहर प्रमुख ज्योतीताई सुरोशे यांच्या कार्याचा साई मंदिरात यथोचित सत्कार

राम नवमीचे औचित्य साधत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकारत

उमरखेड
३ एप्रिलच्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या यवतमाळ येथिल कार्यक्रमासाठी , उमरखेड उपशहर प्रमुख ज्योतीताई सुरोशे यांनी शहरातील तब्बल ४५ महिलांना शिवसेनेच्या शिव कार्याची महती पटवून देत त्यांना बसने यवतमाळ येथे शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यास आणले होते आणलेल्या महिलांची ने – आण करत असतांना त्यांची जेवणाची , नाश्त्याची , पाण्याची फलाहाराची व्यवस्था सुद्धा केली होती. शिंदे साहेबांचे परिवर्तनीय विचार ऐकुन महिलांनी ज्योतीताईचे आभार मानले यवतमाळ महिला जिल्हा संपर्क प्रमुख कालिंदाताई पवार व महिला जिल्हा प्रमुख वैशालीताई मसाळ यांचे प्रेरणेने व उमरखेड शहर प्रमुख ॲड . संजिवकुमार जाधव , महिला शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे ध्येय धोरणे महिलांना समजावून सांगत पक्षवाढीचे कार्य करत तब्बल ४५ महिलांना यवतमाळ येथे बसने आणणाऱ्या कार्यतत्पर अशा ज्योतीताईचा साडी चोळी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . या प्रसंगी शहर प्रमुख ॲड संजिवकुमार जाधव , महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी , महिला संघटिका संगिताताई धाबे , शिवकन्या सुरोशे ,अनुसुचित जाती सेलचे प्रमुख ॲड .अजय पाईकराव , मा .उप जिल्हा प्रमुख कैलास कदम , उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर व दामोदर इंगोले , वसंता देशमुख , प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड यांचेसह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!
WhatsApp Group