युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यकारणी गठीत उमरखेड –
युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यकारणी गठीत
उमरखेड –
तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर युवा ग्रामीण पत्रकार संघटना गठीत होत आहे.कारण पत्रकारावर वारंवार होणारे भ्याड हल्ले, राजकीय दबाव, ठेकेदारीच्या नावावर काम करणारे प्रशासनाचे दलाल, लाच लुचपत घेऊन दसरा दिवाळी साजरी करणारे भ्रष्ट अधिकारी यांचा बोलबाल्याचा डंका सध्या संपूर्ण भारतभर गाजत आहे. त्यामुळे जागतिक चौथ्या आधारस्तंभाचे निस्वार्थी व निर्भीड पत्रकार अनेक कंत्राटी कामामध्ये अनियमिता व अपरातफर करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध वास्तव्य स्थिती बातमीच्या माध्यमातून प्रकाशित करून जनतेसमोर निर्भीडपणे मांडतात. पत्रकाराला राजकीय दबाव येतो, खोट्या गुन्ह्यात विनाकारण अडकून टाकील अशा धमक्याही येतात, त्याहीपेक्षा क्रूर प्ररवृत्ती पत्रकाराचा आवाज कायमचा बंद करण्यासाठी कित्येक पत्रकाराची निर्गुण हत्या केली जाते. त्यामुळे पत्रकाराचे परिवार देशोधडीला लागतात. पत्रकारांना न्याय मिळवून देण्याकरिता युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आर. कचकलवार यांनी उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह आयोजित मिटिंग संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष विजय कदम व महिला तालुकाध्यक्ष अन्नपूर्णा बनसोड व सचिव पदी वसंता नरवाडे यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदस्य. सुनील भाऊ ठाकरे, (तालुका उपाध्यक्षपदी शेख इरफान शे. ईसा, )अशोक गायकवाड,गजानन वानखेडे, सुहास खंदारे, शेर सिंग जाधव, सर्वांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुहास खंदारे यांनी केले.