महिमाच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींस अटक करण्यासाठी पालकांचा पळशी फाट्यावर पाच तास रास्ता रोको तपास अधिकारी म्हणून शंकर पांचाळ नियुक्त उमरखेड :-
महिमाच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींस अटक करण्यासाठी पालकांचा पळशी फाट्यावर पाच तास रास्ता रोको
तपास अधिकारी म्हणून शंकर पांचाळ नियुक्त
उमरखेड :-
स्कूल बस अपघातात निवृत्ती पावलेल्या महिमाला न्याय मिळावा यासाठी दि 5 फेब्रुवारी रोजी उमरखेड पुसद मार्गावरील पळशी फाटा येथे सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत संतप्त पालकांनी तब्बल पाच तास दुसऱ्यांदा रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले .त्यानंतर दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी महिमाच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील आरोपी न्यायालयातून सुटका कामा नये यासाठी पोलीस प्रशासन योग्य दिशेने तपास करीत असून महिमा ला न्याय मिळवा याकरता सर्वतोपरी करीत असून तपासावर संशय व्यक्त होत असल्याकारणाने संबंधित तपास अधिकारी पंकज दाभाडे यांच्याकडून तपास काढून उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्याकडे तपास दिला असून लवकरच तपासाला गती मिळेल असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलन कर्त्यांना दिल्याने तब्बल पाच तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले .
दिनांक 25 जानेवारी रोजी झालेल्या स्कूल बस अपघातात महिमा सरकटे विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला .सदर प्रकरणात वाहन चालकास तत्काळ अटक करण्यात आली परंतु प्रकरणातील आरोपी संस्थाचालक दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांनाअटक करण्यास तपास अधिकारी पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून पालक मंडळींनी पळशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते .त्यावेळी उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आरोपीस 4 दिवसात अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले .पोलीस आपल्याशी वेळकाढू धोरण अवलंबित असून आरोपीच्या बाजूने काम करीत असल्याचा संशय पालकांना बळावला त्यामुळे त्यांनी दि 5 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तब्बल पाच तास आंदोलन केले .उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांना पोलिसांची भूमिका समजावून सांगितली त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले .यावेळी माजी जि. प . सदस्य चिंतागराव कदम ,एडवोकेट संजीव जाधव,रविकांत रुडे , जेष्ठ शिवसैनिक कैलास कदम ,एड . अजय पाईकराव , संदीप ठाकरे ,राजू गायकवाड यांनीही तपास अधिकारी बदलून प्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावा अशी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे मागणी केली होती .त्यांची मागणी तात्काळ मान्य करून सदर प्रकरणाचा तपास उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्याकडे देण्यात आल्याचे आंदोलन स्थळी सांगण्यात आले .तब्बल पाच तास चाललेल्या या आंदोलनामुळे पुसद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती .