कल्याणी इंगोलेची अँँरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये निवड.

youtube

कल्याणी इंगोलेची अँरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये निवड.
औरंगाबाद /प्रतिनिधी

संगणक अभियांत्रिकीमध्ये मास्टर्स करण्यासाठी कल्याणी निवृत्ती इंगोलेची जगप्रसिद्ध असलेल्या अमेरीकेच्या अँरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये निवड झाली आहे. कल्याणीला न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी,फ्लोरिडा युनिव्हर्सिटी आणि इतर बर्‍याच जगप्रसिद्ध विद्यापीठांकडून प्रवेश मिळाले होते.
वाळूज एमआयडीसी परिसरातील सिडको महानगर एक मध्ये राहणाऱ्या कल्याणी इंगोले हिने विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथून 2021 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकी दरम्यान तिने आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये तीन संशोधन प्रकाशित केले होते आणि राष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाडसह विविध स्पर्धा देखील जिंकल्या आहेत.
या निवडीबद्दल कल्याणीला तिच्या शाळेकडून तसेच स्थानिक रहिवासी मित्र-मैत्रीनी कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.(संजय काळे/ वाळूजमहानगर)

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!