मुख्याध्यापक प्रमोदराव देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्री माई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

मुख्याध्यापक प्रमोदराव देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्री माई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
उमरखेड( प्रतिनिधी) महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे कर्तव्यदक्ष आणि उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून ज्यांचा जिल्ह्यात परिचय असा आहे विविध शैक्षणिक व सामाजिक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम विद्यालयात राबवून उमरखेड तालुक्यात शिक्षणाचा महात्मा फुले पॅटर्न आधुनिक पद्धतीने राबवणारे श्री प्रमोद राव देशमुख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने व शिक्षण विभागाने यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे.
प्रमोद राव देशमुख हे एक उत्कृष्ट संवादक, समुपदेशक विद्यार्थी प्रिय व पालक प्रिय, प्रेरणादायी वक्ते, आधुनिक विचारसरणीचे मुख्याध्यापक व विविध प्रशिक्षणामध्ये त्यांनी तज्ञ मार्गदर्शनाचे काम केलं व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात दोन वेळा जिल्हास्तरीय विज्ञान परिषद प्रदर्शन राबवून उमरखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरावयास भाग पाडले. शैक्षणिक उपक्रम कुठलाही असो ते अत्यंत हिरीरीने भाग घेऊन विद्यार्थ्याप्रती आपली निष्ठा व्यक्त करतात. त्यांचा हाच गुण गेल्या सात वर्षापासून विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शंभर टक्के निकालाची परंपरा यशस्वीपणे राबवत आहे. अनेक विद्यार्थी विद्यालयाच्या विविध उपक्रमातून विविध कंपन्यांमध्ये तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी भरारी घेतलेली आहे. सरांचे अनेक विद्यार्थी कीर्तनकार सामाजिक कार्यामध्ये सुद्धा भाग घेताना दिसतात. सरांना हा पुरस्कार देऊन शासनाने योग्य अशा कर्तुत्वान व्यक्तीची निवड केल्याबद्दल सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
सरांच्या या पुरस्काराबद्दल यवतमाळ जिल्हा समाज संस्थेचे अध्यक्ष माननीय रामसाहेब देवसरकर सचिव डॉक्टर या.मा.राऊत साहेब व संचालक मंडळ, विद्यालयाचे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, यांनी अभिनंदन केलेले आहे व राष्ट्रपती पुरस्कारासाठी देखील शुभेच्छा दिलेले आहेत….
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://www.binance.com/tr/register?ref=OMM3XK51