कुरळीचा पाझर तलाव फुटला.
कुरळीचा पाझर तलाव फुटला
[शेकडो हेक्टर मधील पिके उध्वस्त : अनेक घरात घुसले पाणी.]
*प्रतिनिधी /ढाणकी :*
उमरखेड तालूक्यातील कुरळीच्या जंगलात, शेतशिवारात असलेला पाझर तलाव फुटल्याने, शेकडो हेक्टर मधील पिके उद्धवस्त झाले असून, गावातील अनेक घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे .
पाटबंधारे विभागाने सन १९६० मध्ये कुरळी गावाच्या शेजारील जंगलामध्ये, १० एकर जमीनीत पाझर तलावाची निर्मीती केली होती .
यादवराव जळबाराव नपते कुरळी यांच्या सर्वे नंबर १४८ शेतामधला पाझर तलाव संततधार पावसामुळे फुटला . त्यामुळे त्यांच्या १७ एकर पिकासह, इतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे . या तलावाची देखरेखच नसलल्यामुळे तलाव क्रॅक झाला होता. असे असतांनाही दरवर्षी या तलावाचा लिलाव, मासेमारीसाठी होत असल्याने प्रशासनाला महसूलही मिळत होता. तलावाची देखरेख न झाल्याने आज रोजी हा पाझर तलाव फुटला. यामध्ये शेतकऱ्यांची पिके, मासेमारी करणाऱ्यांचे मासे वाहून गेल्याने, तसेच अनेक घरात पाणी घुसल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे . याची माहीती पोलिस पाटील , सरपंच यांनी प्रशासनाला दिली असून, आपादग्रस्तांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे .
पाझर तलाव फुटून याखाली येणाऱ्या शेकडो जमीनीतील पाण्याखाली