भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी.

youtube

भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी

उमरखेड :- अक्षय तृतीये निमित्त येथील ब्राम्हण समाज व बहुभाषीय ब्राम्हण समाजा कडुन भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भगवान परशुराम यांची प्रतिमा व सजीव देखावा घोड्याच्या आकर्षक रोशनाई ने सजलेल्या रथातून ब्राह्मण सभा मंगल कार्यालया पासुन बँड पथका समवेत सुवर्ण मार्ग पथा वरून मार्गक्रमण करुन नागचौक, श्रीराम चौक, महात्मा गांधी चौक, हुतात्मा चौक या मार्गे ब्राह्मण सभा मंगल कार्यालय येथे शोभायात्रा संपली.
शोभयात्रेत शहरातील सर्व लहान थोर महिला व पुरुष ब्रम्हवृंदानी सहभाग घेतला होता. चौभारा चौक येथे राजस्थानी ब्राह्मण समाज तर्फे सर्व समाजबांधव यांना शरबत वाटप करण्यात आले व श्रीराम चौकात संपूर्ण राजस्थानी समाजा कडुन प्रतिमेचे पुजन केल्या गेले व आईस्क्रीम वाटप करण्यात आले. महात्मा गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, दिलीप सुरते, किसन वानखेडे, गजानन भारती, पुंडलिक कुबडे, सुधाकर लोमटे,श्रीराम मित्र मंडळ यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केले. ब्राह्मण सभा मंगल कार्यालय येथे शोभायात्रे ची सांगता भगवान परशुरामची आरती करून करण्यात आली.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!