उमरखेड नगरपरिषदेचा राज्यात द्वितीय क्रमांक दहा कोटी चा धनादेश सन्मानित.

youtube

उमरखेड नगरपरिषदेचा राज्यात द्वितीय क्रमांक दहा कोटी चा धनादेश सन्मानित

उमरखेड:
महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई यांचे मार्फत दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी मुंबई येथे नगर विकास दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील शहर सौदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये ब वर्ग नगरपरिषद या गटातुन उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल उमरखेड नगरपरिषदेस द्वितीय क्रमांकाने नगर विकास दिनाच्या निमित्ताने एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री महेशकुमार जानोर यांना पारीतोषिक व प्रशस्ती पत्र 10.00 कोटी इतक्या रक्कमेचा धनादेश देवून गौरविण्यात आले. याबद्दल मुख्याधिकारी नगरपरिषद उमरखेड यांचेतर्फे नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरीकांचे अभिनंदन करण्यात आले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!