महाशिवरात्री महोत्सव निमित्त २६ ते ३ मार्च पर्यंत शहरात बारा ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा

महाशिवरात्री महोत्सव निमित्त २६ ते ३ मार्च पर्यंत शहरात बारा ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा*
*प्रतिनिधी*
*उमरखेड* :
शहरात महाशिवरात्री महोत्सव निमित्त भारताचे सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग दर्शन औदुंबर नगरीमध्ये उद्घाटन आमदार किसनराव वानखेडे व नितीन भुतडा यांच्या हस्ते.करण्यात आले .
विवेकानंद कॉलनी उमरखेड येथे ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालय
शांन्तीभवन येथे शिलू दिदि, व मोनादिदि यांच्या प्रयत्नातून शिवजयंती निमित्त बारा ज्योतिर्लिंग भाविक भक्ताच्या दर्शनासाठी खुले केले . सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत सर्व भाविक भक्तांना हे दर्शन करण्यासाठी खुले राहील .
दररोज सकाळी साडेआठ वाजता या बाराही ज्योतिर्लिंगाचे पूजन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुजन होऊन भाविक भक्तासाठी खुले ठेवण्यात येणार आहे .
आजपासुन ते सोमवार पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच प्रवेशद्वारातून बाराही ज्योतिर्लिंग चे दर्शन शहरवासीयांना व तालुकावाशी यांना होणार आहे आज पासून ते 3 मार्च 2025 या दरम्यान एकाच वेळी एकाच प्रवेशद्वारातून बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना होणार आहे तसेच सकारात्मक VB चिंतनासाठी राजयोग मेडिटेशन शिबिर दिनांक १ मार्च ते ५ मार्च दरम्यान ठेवल्यात आले आहेत या शिबिराची वेळ सकाळी ८ ते साडेनऊ तर संध्याकाळी साडेसहा ते ८ या वेळात ठेवण्यात आलेले आहेत . अध्यात्माने मनाला शांती मिळत असते आज धकाधकीची जीवनशैली प्रत्येकांची आहे त्यामुळे या सर्वांमधून स्वतःला वेळ देण्यासाठी सकारात्मक चिंतनासाठी राजयोग मेडिटेशन शिबिराची खूप अत्यंत आवश्यकता असल्यामुळे या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा हे सर्व कार्यक्रम ब्रम्हाकुमारीय ज्ञानकिरण भवन विवेकानंद कॉलनी महागाव रोड उमरखेड येथे ठेवण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याच्या आव्हान शिलू दिदि आणि मोनादिदि यांच्या तर्फे करण्यात आले आहे.