अधिवक्ता ऍड. अनिल माने चातारीकर यांची उमरखेड विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती

अधिवक्ता ऍड. अनिल माने चातारीकर यांची उमरखेड विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती
उमरखेड :
तालुक्यातील प्रभावी नेतृत्व व भाजपाचे जेष्ठ नेते अधिवक्ता ऍड. अनिल माने चातारीकर यांची उमरखेड विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार किसन वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाली असून संपूर्ण मतदारसंघात याबाबत समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.
ऍड. अनिल माने चातारीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाच्या विचारधारेनुसार संघटनात्मक काम करत असून त्यांचे संघटन कौशल्य, जनसंपर्क व समाजकारणातील सक्रिय सहभाग यामुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे उमरखेड विधानसभेतील पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीमुळे पक्षातील सर्व कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून, येणाऱ्या काळात भाजपाचे जनाधार अधिक वाढविण्यासाठी व कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी माने चातारीकर यांचे नेतृत्व परिणामकारक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.