कृष्णापुर येथील लहान तांडा येथील रस्ता करा
कृष्णापुर येथील लहान तांडा येथील रस्ता करा.
[ तहसीलदार व अर्थ व बांधकाम सभापती जि.प. यवतमाळ कृष्णापुर लहान तांडा येथील ग्रामस्थांनी दिले निवेदन]
उमरखेड(प्रतिनिधी)
दि.23_जुलै
कृष्णापूर व कृष्णापुर लहान तांडा यांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणजेच पांदण रस्ता,1200 ते 200 लोकवस्ती असलेला तांड्यातील रहिवाशांना प्रत्येक कामासाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी,रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी मुख्य गावात तसेच गावातील शेतकरी शेतमजूर यांना, ‘शेतीत’ जाण्यासाठी याच पांदण रस्त्याचा वापर करावा लागतो.
सदर पांदण रस्ता कच्चा असल्यामुळे जानेवारी ते मे, वर्षातील फक्त पाच महिने वापरण्या योग्य असतो, जून मध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर गावातून पांदण रस्त्या कडे जातांना, कृष्णापुर गावालगत असलेला मुख्य मोठा नाला या मार्गावरील सर्वात मोठा, अडथळा ठरत आहे.
सदर नाला पिरंजी पासून वाहत येत असल्यामुळे, थोड्या पावसातही नाल्याला भरपूर पाणी वाहत, त्यामुळे तांडा आणि गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो, अशा परिस्थितीत तांड्यातील रहिवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो.
तांड्यातील गंभीर रुग्ण किंवा गरोदर महिला यांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असते, परंतु चिखलाने निसरडा बनलेला खड्डेमय कच्चा रस्ता व नाला पार करून गावात पोहोचणे तांडा रहिवाशांना जीवघेणे ठरू शकते, सदर पांदन रस्ता पक्का करण्यासाठी तसेच नाल्यावर फुल तयार करणेसाठी सरपंच/सचिव/ ग्रामपंचायत कृष्णापुर यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले.
परंतु दरवेळी त्यांनी आमच्या गावकऱ्यांना केराची टोपली दाखवली आहे, तरी तहसीलदार यांनी सहानुभूती पूर्वक विचार करावा व आम्हा गावकऱ्यांना, बारा माही ये-जा करता येईल असा रस्ता करून द्यावा ही विनंती समस्त कृष्णापूर (लहान तांडा) यांनी केली.