उमरखेड शहरातील असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश.. प्रवेशित युवकांना सन्मानाची वागणूक देऊ- नितीन भुतडा.

youtube

उमरखेड शहरातील असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश..
प्रवेशित युवकांना सन्मानाची वागणूक देऊ- नितीन भुतडा

उमरखेड -/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात देशभरात तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नतृत्वात राज्यात सुरू असलेली यशस्वी घोडदौड व उमरखेड विधानसभेत यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा आणि आ नामदेव ससाणे यांचे संघटनात्मक व विकासात्मक कार्येपद्धतीवर प्रभावित होऊन उमरखेड शहरातील असंख्य युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
नवप्रवेशीतांचा प्रवेश हा दि.25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी नितीन भुतडा यांचे निवासस्थानी पार पडला. पक्ष नैतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात दाखल होणाऱ्या प्रत्येक युवकांना सन्मानाचीच वागणूक देण्यात येईल असे आश्वासन यावेळी यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा यांनी उपस्थित युवकांना दिले.
यावेळी गणेशराव वाकडे, सचिन बंग, संदीप सूर्यवंशी, सतीश पुरी, आकाश बोरकर, अजय महामुने, सोमनाथ शहाणे, पवन वाकडे, व्यंकटेश वाकडे, दिनेश महामुने, दिनेश भंडारी, कृष्णा जवणे, सागर अधापुरे,स्वप्नील अधापुरे, सारंग महामुने, अमोल लव्हाडे, यश महामुने, जय महामुने,अंबादास शहाणे, अदित्य कुलथे, अदित्य वाकडे, ओम वाकडे, निर्गुण पांचाळ, किरण शेटे इत्यादि युवकांनी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी शहर अध्यक्ष प्रकाश दुधेवार, माजी नप.सभापती शैलेश मुंगे,
अतुल खंदारे, महागाव तालुका सरचिटणीस योगेश बाजपेयी, संतोष पडोळकर, कुंदन लखदिवे,पवन मेंढे,अंकुश उदावंत हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!