कर्जमाफीच्या मुद्द्याला घेऊन प्रहार चे कार्यकर्ते आक्रमक मध्यरात्री बारा वाजता आमदाराच्या घरावर काढला मशाल मोर्चा उमरखेड-

कर्जमाफीच्या मुद्द्याला घेऊन प्रहार चे कार्यकर्ते आक्रमक
मध्यरात्री बारा वाजता आमदाराच्या घरावर काढला मशाल मोर्चा
उमरखेड-
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होत सरकारला घेण्यासाठी महाराष्ट्रभर असणाऱ्या सत्ताधारी मंत्र्यांच्या व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने गळ्यात निळा दुपट्टा, हातात मशाल व भगवा ध्वज घेत रात्री बारा वाजता मशाल आंदोलनाची घोषणा केली.
दि.11 एप्रिल रोजी उमरखेड येथे रात्री 12 वाजता हातात पेटती मशाल घेऊन शेकडो शेतकरी व दिव्यांगा बांधवान सह प्रहार कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार किसनराव वानखेडे यांच्या घरावर मशाल मोर्चा काढत शेतकऱ्यांच्या मागण्याला घेऊन आक्रमक होताना पाहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मुर्तीजापुर विधानसभेचे हरीश पिंपळे यांच्या प्रचारादरम्यान आमचे सरकार आले तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशाश्वसन दिले होते. त्या आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी , शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, पेरणी ते कापणी पर्यंतचे सर्व कामे एम.आर.जी.एस मधून करावी, दिव्यांगाना प्रति महा 6000 हजार रुपये महिना मिळावा या मागण्यांना करिता आमदार च्या घरावर मशाल मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून करत नाथ नगर येथील भाजपा आमदार किसनराव वानखेडे यांच्या घरापर्यंत करण्यात आली होती.पोलिसांनी आंदोलनाची तीव्रता पाहता आमदाराच्या घराला चार ही बाजूस सुरक्षा कटडे बांधून सुरक्षारक्षक तैनात केले होते. प्रहार कार्यकर्ते आमदाराच्या घरासमोर येतात घोषणाबाजी करत आक्रमक झाले असल्याने काही काळ सदर परिसरात तणावाचे वातावरण होते. या आंदोलनादरम्यान आमदारांनी आंदोलकांची भेट घेऊन आपल्या सदर मागण्या आम्ही शासन दरबारी पोहोचू अशी हमी दिली. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड व महागाव तालुक्यातील कार्यकर्ते शेतकरी बांधव तसेच दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-चौकट-
आमदाराच्या घरासमोर लटकविले शेतकऱ्यांचे फाशी घेताना चे प्रतीकात्मक पुतळे
या मोर्चादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्याकडून आमदाराच्या घरासमोर शेतकरी बांधवांनी फाशी घेतलेले प्रतीकात्मक पुतळे लटकवीत तात्काळ यवतमाळ जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा म्हणून लागलेला डाग तात्काळ पुसून काढण्यासाठी उपाय योजना करावे अशी मागणी केली.
-चौकट-
पोलिसांनी केले आंदोलकानना स्थान बद्दल.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना व शेतकरी बांधव तसेच दिव्यांगांना काही काळासाठी पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशन येथे स्थान बदल केले होते.