शेडमध्ये झोपलेल्या दोघी मायलेकीला इंडिका ने चिरडले माहूरच्या देवदेवस्थाना वरील दुर्दैवी घटना

youtube

शेडमध्येआ झोपलेल्या दोघी मायलेकीला इंडीकाने चिरडले
एकीचा जागीच मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी

*माहुरच्या देवदेवेश्वर येथील दुर्दैवी घटना*

माहुर ता.प्र. नितीन तोडसाम
दि १२ मे.

:-माहूर येथील श्री देवदेवेश्वर मंदिर च्या शेडमध्ये झोपलेल्या दोघी माय व लेकीस इंडिका कारने चिरडले एकीचा जागीच मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. 12 मे रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली.
हदगाव तालुक्यातील करोडी या गावच्या लक्ष्मीबाई शिवराम खंदारे वय 70 वर्ष तिची विधवा मुलगी शीला आनंदराव इनकर वय 48 वर्षे या दोघी पाच ते सहा दिवसांपूर्वी देवदर्शना निमित्त माहूर येथे आल्या होत्या. दिनांक 11 मे रोजी रात्री त्या देवदेवेश्वर येथील शेडमध्ये झोपल्या होत्या. पहाटे अचानक एम.एच.४४ जी ०३७५ क्रमांकाच्या टाटा इंडिका विस्टा या कारच्या चालकाने अक्षम्य हलगर्जीपणाने गाडी चालवत शेडमध्ये झोपलेल्या अवस्थेत असलेल्या या मायलेकीच्या अंगावरवरून गाडी नेली. यात शिला आनंदराव ईणकर हिच्या छाती, बरगड्या,व पोटावरून गाडीचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. तर तीची आई लक्ष्मीबाई शिवराम खंदारे हिच्या उजवा हाताच्या मनगट, गुडघा व खांद्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी होऊन थोडक्यात बचावल्या.
माहूर पोलीस स्टेशनच्या रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस गाडी चे चालक गुरनुले यांनी ताबडतोब घटनास्थळावरून दोघी जखमी महिलांना माहूरच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ.बोडके यांनी जखमींची तपासणी करून यातील शिला ईणकर हिचा तत्पूर्वीच जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तर लक्ष्मीबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या मयत शिलाबाई हिच्या पतीचे २० वर्षापूर्वी निधन झाले असून,आधिच वडिलांचे छत्र हरवलेल्या कोमलची आईचेही या दुर्दैवी घटनेत निधन झाल्याने ती आता या जगात पोरकी झाली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पोलीसांनी अपघात करणारी गाडी जप्त करून ठाण्यात जमा केली आहे. पुढील तपास पो. नि.नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अण्णासाहेब पवार हे करीत आहेत.

Google Ad
Google Ad

6 thoughts on “शेडमध्ये झोपलेल्या दोघी मायलेकीला इंडिका ने चिरडले माहूरच्या देवदेवस्थाना वरील दुर्दैवी घटना

  1. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!