उमरखेड येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना सार्वपक्षिय व सामुहिक श्रद्धांजली अर्पन उमरखेड : –

youtube

उमरखेड येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना सार्वपक्षिय व सामुहिक श्रद्धांजली अर्पन

उमरखेड : –

बारामती येथील विमानतळावर दिनांक 28 रोजी सकाळी विमान अपघातात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी निधन झाले . संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे .
दिनांक 29 रोजी येथील उमरखेड स्थानिक नगर परिषद सांस्कृतिक भवन येथे सर्व पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांनी मटले कि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार अचानक सोडून जातील व महाराष्ट्राचा खंबीर धाडसी व्यक्तीमत्व असलेले नेतृत्व दादा हरपला ही खुप दुखद घटना आहे.अशा भावना व्यक्त केले.तसेच माजी आमदार प्रकाश पाटील यांनी आपले अश्रू अनावर करीत असताना श्रध्दांजली वाहत महाराष्ट्रा चा खंबीर नेतृत्व हरपला आहे. राजकारणातला दादा आपल्यातून निघुन गेला असे बोलताना सांगितले दादांना लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी येथील नगर परिषद च्या सभागृहात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
महायुतीतील एक खंबीर नेतृत्व तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा ची प्रशासनावर छाप होती महाराष्ट्रातला माणुस त्यांना दादा म्हणुन ओळखायचा दादाच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे .
सदर श्रद्धांजली कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीचे तालुकाध्यक्ष शंकरराव तालंगकर व कार्याध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे संचालक सुरेश कदम यांनी केले तर श्रद्धांजलीपर आभार शंकरराव तालंगकर यांनी मानले .
यावेळी आमदार किसनराव वानखेडे, नगर अध्यक्षा तेजश्री जैन, नंदकिशोर अग्रवाल, दतराव शिंन्दे, तातू देशमुख, सतीश नाईक, ,राजु जयस्वाल,भास्कर पंडागळे, बाळासाहेब नाईक, शुभाष शिंन्दे ,देविदास खोकले, सतिश नाईक , भा. जि. सरचिटणीस महेश काळेश्वरकर ,सभापती कृष्णा पाटील देवसरकर, सरोजताई देशमुख ,गुणवंतराव सूर्यवंशी यांनी श्रद्धांजलीपर कार्यक्रम आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरातील गोपाल अग्रवाल , नगरसेवक प्रकाश शिकारे,गजेंद्र ठाकरे, शारूख पठाण, डॉ प्रतिक रुडे ,प्रवीण पाटील मिरासे , पत्रकार सविता चंद्रे ,शैलैश ताजवे, संदीप ठाकरे यासह विविध सामाजिक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी व नेते व न. पा.चे मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे,गिरीष गारूडी या सह नगरपरिषदेतील कर्मचारी उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

1 thought on “उमरखेड येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना सार्वपक्षिय व सामुहिक श्रद्धांजली अर्पन उमरखेड : –

  1. **neurosharp**

    Neuro Sharp is an advanced cognitive support formula designed to help you stay mentally sharp, focused, and confident throughout your day.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!